अंगणवाड्यांच्या वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक

By admin | Published: December 19, 2015 03:28 AM2015-12-19T03:28:10+5:302015-12-19T03:28:10+5:30

पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यातील अंगणवाड्यांना वीज जोडण्यासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी लवकरच आढावा बैठक घेण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा, नवीन

Review meeting on anganwadi power supply | अंगणवाड्यांच्या वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक

अंगणवाड्यांच्या वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक

Next

नागपूर : पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यातील अंगणवाड्यांना वीज जोडण्यासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी लवकरच आढावा बैठक घेण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी प्रश्नाच्या उत्तरात दिली.
अंगणवाड्यांच्या वीज जोडणीचे अर्ज प्राप्त झाले तर एक महिन्यात ते निकाली काढले जातील. परंतु अंगणवाड्यांनी वीज जोडण्याबाबतचे अर्ज महावितरणकडे अद्याप सादर कलेले नाही. त्यामुळे या तालुक्यात हा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी उत्तरात स्पष्ट केले. जव्हार तालुक्यातील ३०५ तर मोखाडा तालुक्यातील २२९ अंगवाड्यांना अद्याप वीज जोडण्या देण्यात आलेल्या नाही. तसेच अंगणवाड्यातील जलशुद्धीकरण यंत्रे बंद अवस्थेत असल्याचे सदस्य आनंद ठाकूर यांनी या प्रश्नाच्या माध्यमातून निदर्शनास आणले. दुर्गम भागातील अंगणवाड्या, शाळा व ग्रामपंचायतींना वीज जोडण्या देण्याचे शासन धोरण असल्याचे शोभाताई फडणवीस यांनी निदर्शनास आणले. दुर्गम भागात विजेचा प्रश्न असल्याने अंगणवाड्यांना सोलर युनिट देण्यात यावे, अशी सूचना नरेन्द्र पाटील यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Review meeting on anganwadi power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.