पीक परिस्थितीचा आढावा
By admin | Published: July 30, 2015 03:18 AM2015-07-30T03:18:13+5:302015-07-30T03:18:13+5:30
केंद्रीय कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव व दुष्काळ निवारण समितीचे आयुक्त राघवेंद्र सिंग यांनी बुधवारी राज्यातील दुष्काळ व पीक परिस्थितीचा आढावा घेतला.
पुणे : केंद्रीय कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव व दुष्काळ निवारण समितीचे आयुक्त राघवेंद्र सिंग यांनी बुधवारी राज्यातील दुष्काळ व पीक परिस्थितीचा आढावा घेतला. कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी त्यांच्यासमोर राज्याची परिस्थिती मांडली.
राघवेंद्र हे कर्नाटक, गुजरात व महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी मंत्रालयात बैठक घेऊन महाराष्ट्राची परिस्थिती समजावून घेतली. त्यांच्यासमवेत केंद्राच्या फलोत्पादन विभागाचे संचालक अतुल पाटणे होते. येत्या दोन-तीन दिवसांत ते मराठवाड्यातील काही भागांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थिती पाहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयुक्त देशमुख यांनी राज्यातील पाऊस व पेरण्यांची स्थिती त्यांच्यासमोर सादर केली. पावसाने काही भागात ताण दिला असल्याने राज्याने चारा-पीक उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच दुबार पेरणी व काही फळबागा वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या खर्चाची आकडेवारी सिंग यांच्यासमोर सादर करण्यात आली.