रोडरोमिओंच्या त्रासाने मुली हैराण

By admin | Published: April 6, 2017 12:45 AM2017-04-06T00:45:57+5:302017-04-06T00:45:57+5:30

वडगाव शेरी-चंदननगर परिसरात सध्या गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमिओंचा उच्छाद वाढत आहे.

Rhinos girl harasses | रोडरोमिओंच्या त्रासाने मुली हैराण

रोडरोमिओंच्या त्रासाने मुली हैराण

Next


चंदननगर : वडगाव शेरी-चंदननगर परिसरात सध्या गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमिओंचा उच्छाद वाढत आहे. यामुळे शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना, महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळा भरते व सुटतेवेळी अशा रोडरोमिओंना उधाण येत असून शाळा, महाविद्यालयीन परिसरात असे तरुण बिनधास्तपणे वावरत असल्याचे चित्र वडगाव शेरी-चंदननगर परिसरातील दिसून येत आहे.
वडगाव शेरी-चंदननगर भागातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर काही खासगी व सरकारी शाळा असून, या शाळांच्या परिसरात टार्गट मुलांचा त्रास विद्यार्थिनींना होत असल्याचे दिसून येत आहे. एका दुचाकीवर तिघेजण बसून कर्कश्श हॉर्न वाजवणे, भरधाव वाहन चालवत मुलींना कट मारून निघून जाणे, असे प्रकार दररोज घडत आहेत.
वडगाव शेरी, चंदननगर भागातील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालयांत शिक्षण घेण्यासाठी येणारी नजीकच्या भागातील व उपनगरांतील मुलींची संख्या मोठी आहे.
मुलींना बसने प्रवास करावा लागतो. बसस्थानकाडे चालण्याच्या रस्त्यावर येताच रोडरोमिओ मोठ्यासंख्येने हिरोगिरी करतात. वर्गामध्येही काही मुले असे प्रकार करत असून, त्यांना बाहेरील मुलांचाही पाठिंबा मिळत असतो.
चंदननगरमधील संत तुकाराम महाविद्यालय व शाळांच्या दोन्ही गेटवर रोडरोमिओ नजरा रोखून बसलेले पहावयास मिळतात. वडगाव शेरी, जुना-मुंढवा रस्ता, कल्याणीनगर, पाचवा मैल, विमाननगर, आनंदपार्क, खराडीगाव, खुळेवाडीगाव, वडगाव शेरी, विमाननगर येथील शाळा- महाविद्यालयांसमोर रोडरोमिओंचा ठिय्या असतो.
बुलेट राजांचा त्रास
शाळा व महाविद्यालय परिसरात बुलेट राजांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिवसाढवळ्या शाळा-महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस संस्थेच्या सर्व दरवाजांसमोर ही टपोरी मंडळी घोळक्याने उभी असतात आणि सर्वांच्या समोर मुलींची छेड काढतात. पोलिंसाचा कानोसा लागताच हे रोडरोमिओ धूम ठोकतात.
चंदननगर बाजार परिसरात एका मुलीचे नाव रस्त्याच्या कडेच्या भिंतीवर ठळकपणे लिहिले होते. त्यामुळे त्या मुलीला आणि तिच्या परिवारातील लोकांना नाहक त्रास झाला होता. त्या वेळी सचिन सातपुते यांनी तक्रार देऊन पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली होती.
वडगाव शेरीतील एका शाळेतील पीटी शिक्षकाने मुलीचा विनयभंग केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती.
भाजी मंडई टार्गेट...
चंदननगर भाजीमंडई, शिवाजीमहाराज पुतळा, जुनी भाजीमंडई, वडगावशेरी गावठाणातील भाजीमंडई, गणेशनगर या मंडईमध्ये दररोज हजारो महिला व मुली मंडई खरेदीसाठी येत असतात. त्यावेळी हे रोडरोमिओ मंडईच्या आजूबाजूला घोळक्याने थांबतात व शेरेबाजी करतात. गर्दीच्या ठिकाणी पोलीस गस्त असावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Web Title: Rhinos girl harasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.