धनी; दया हो मजला शौचालय बांधूनी....!
By admin | Published: October 17, 2016 02:55 PM2016-10-17T14:55:47+5:302016-10-17T14:55:47+5:30
धनी; दया हो मजला शौचालय बांधूनी, हात जोडुनी पाया पडूनी, करीते तूम्हा विनवणी ! अशा प्रकारे विविध गिते सादर करुन धम्माल करणोर विनोद सादर करुन
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १७ - धनी; दया हो मजला शौचालय बांधूनी, हात जोडुनी पाया पडूनी, करीते तूम्हा विनवणी ! अशा प्रकारे विविध गिते सादर करुन धम्माल करणोर विनोद सादर करुन स्वच्छता अभियान, स्त्रीभ्रूणहहत्या, दारूबंदी अशा ज्वलंत विषयावर भाष्य करत सवार्नाच अंतर्मूख करणारा बहारदार कार्यक्रम बाभूळगाव येथील शाहीर वामन वाणी यांनी तालुक्यातील सुरकंडी घेण्यात आला.
ग्रामीण भागात प्रामुख्याने जाणवणाऱ्या समस्या उजागर करण्यासाठी प्रबोधन हे महत्वाचे साधन असल्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समस्यांवर उपाय सुचविणारी गिते, पोवाडे तसेच धमाल उडवून देणारे विनोद सादर करुन शाहीर वाणी यांनी तीन तास गावकऱ्यांना खिळवून ठेवले. स्त्रीभ्रूणहत्येवर प्रबोधन करताना त्यांनी आई मला मारु नको, जन्माला येऊ दे, जन्माला येऊनी मला जग पाहू दे, तूज्या फुलाच्या कळीला उगवू दे, मला पूढे पूढे जग पाहू दे ! हे एका मूलीचे आपल्या आईला उद्देशून असलेले गीत सादर करुन उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले. दारू पिल्याने संसाराची कशी वाताहात होते हे सांगण्यासाठी त्यांनी हा ऐकेना बाई घरवाला काही, नूसता गावभर फिरते वं, हे रोज मला मारते वं, दारू पियाले मरते वं हे गित सादर करुन महिलांनी आपल्या पतीला दारु पिण्यापासून कशाप्रकारे रोखावे याबाबत मार्गदर्शन केले. समाजात असलेले वास्तव जीवन रेखाटण्यासाठी त्यांनी जन्म देऊनी, आणि पोराला सुखदु:ख कितीतरी साहीलरं, लगीन झाल्यावर मायबाप सोडून पोरगं येगळं राहीलं रं हे गित सादर केले.
गावाचा विकास करण्यासाठी गावकऱ्यांनी कसे एकजूटीने राहीले पाहीजे, रोगराईपासून मुक्त होण्यासाठी हागणदरीमुक्त अभियान राबवावे, घरोघरी शौचालय बांधावे, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, तंटामूक्त गाव निर्माण करावे अशा वेगवेगळ्या विषयांवर शाहीर वाणी यांनी विनोदातून प्रबोधन केले. खंजेरीच्या तालावर मधूर आवाजातून तसेच त्यांचा मुलगा हरीष वाणी यांच्या साथसंगतीत शेकडो नागरीकांना खिळवून ठेवत तब्बल तीन तास गावकऱ्यांचे प्रबोधन केले. या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. योगेश्वर निकस, प्रख्यात सुत्रसंचालनकर्ता सिंधूताई तुपकर, आर.जे. देव, स्वातीताई सदार यांची प्रमूख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन धामणे तर आभार गजानन भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा सामाजीक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शेकडो नागरीकांची उपस्थिती होती