मुंबईमध्ये उद्यापासून रिक्षा व टॅक्सीचा प्रवास महागणार

By admin | Published: June 24, 2015 02:25 PM2015-06-24T14:25:49+5:302015-06-24T15:22:20+5:30

सध्या असलेले रिक्षाचे किमान भाडे १७ रुपयांवरून १८ रुपये होईल तर टॅक्सीचे किमान भाडे २१ रुपयांवरून २२ रुपये होणार आहे.

Rickshaw and taxi journey will start in Mumbai tomorrow | मुंबईमध्ये उद्यापासून रिक्षा व टॅक्सीचा प्रवास महागणार

मुंबईमध्ये उद्यापासून रिक्षा व टॅक्सीचा प्रवास महागणार

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ - ग्राहक पंचायतीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे मुंबईमध्ये रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ उद्यापासूनच लागू होणार आहे. आधीच्या सरकारने नेमलेल्या हकीम समितीच्या शिफारशीनुसारच सध्यातरी रिक्षा व टॅक्सीचे भाडे ठरवण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. त्यामुळे रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ अपेक्षित होती. मात्र, ग्राहक पंचायतीने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत या वाढीला विरोध दर्शवला होता.
हायकोर्टाने भाडेवाढीला हिरवा कंदील दाखवला असल्याने उद्यापासूनच ही भाडेवाढ लागू होणार आहे. सध्या असलेले रिक्षाचे किमान भाडे १७ रुपयांवरून १८ रुपये होईल तर टॅक्सीचे किमान भाडे २१ रुपयांवरून २२ रुपये होणार आहे. सर्व रिक्षांना व टॅक्सींना ही भाडेवाढ लागू करण्यासाठी अापले इलेक्ट्रॉनिक मीटर री-कॅलिब्रेट करावे लागणार आहेत.

Web Title: Rickshaw and taxi journey will start in Mumbai tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.