खारघरमध्ये रिक्षा बंद

By admin | Published: June 11, 2014 12:27 AM2014-06-11T00:27:31+5:302014-06-11T00:27:31+5:30

खारघर परिसरात अनधिकृत प्रवासी वाहतूकदारांचे स्तोम माजले आहे. याचा फटका परवानाधारक रिक्षा चालकांना बसला आहे.

Rickshaw closure in Kharghar | खारघरमध्ये रिक्षा बंद

खारघरमध्ये रिक्षा बंद

Next
>नवी मुंबई :  खारघर परिसरात अनधिकृत प्रवासी वाहतूकदारांचे स्तोम माजले आहे. याचा फटका परवानाधारक रिक्षा चालकांना बसला आहे. याविरोधात आज रिक्षा चालकांनी बंद पुकारून बेकायदा प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली. 
खारघर परिसरात आठ आसनी रिक्षा चालकांनी धुमाकूळ घातला आहे. या रिक्षांना आरटीओची परवानगी नसतानाही खारघर परिसरात सर्रास प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अधिकृत परवाना असलेल्या रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावर याचा परिणाम होताना दिसत आहे. यासंदर्भात अनेकदा रिक्षा चालकांनी आरटीओकडे तक्रारी केल्या आहेत. सहा व त्यापेक्षा अधिक सिटर रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
मात्र पनवेल आरटीओकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला होता. मात्र आरटीओ अधिका:यांच्या ठोस आश्वासनानंतर दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले. असे असले तरी या बंदमुळे 
सकाळच्या सत्रत प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
खारघर वाहतूक शाखेचे संदीपन शिंदे, एकता रीक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष विष्णू पाटील व इतर पदाधिका:यांच्या  उपस्थितीत झालेल्या बैठकीत  प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत पाटील यांनी कारवाईचे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला. (प्रतिनिधी)
 
खारघरमधील बेकायदा प्रवासी वाहतुकीसंदर्भात मागील तीन वर्षापासून आरटीओकडे तक्रारी करीत आहोत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अखेर आज संपाचे हत्यार रिक्षा चालकांनी उगारले होते. असे असले तरी आरटीओ अधिका:यांनी यासंदर्भात ठोस आश्वासन दिल्याने हा संप मागे घेण्यात आल्याचे एकता रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विष्णू पाटील यांनी सांगितले. 
 
खारघर परिसरात जवळपास दोनशेपेक्षा अधिक आठ आसनी रिक्षा आहेत. या रिक्षांना आरटीओची परवानगी नसतानाही ते बेकायदा प्रवासी वाहतूक करत असल्याचा आरोप आहे. 

Web Title: Rickshaw closure in Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.