आपद्ग्रस्तांसाठी रिक्षाचालकाचा मदतीचा हात!

By admin | Published: September 14, 2014 01:30 AM2014-09-14T01:30:41+5:302014-09-14T01:30:41+5:30

पदव्युतर शिक्षण घेऊनही बेरोजगारी नशिबी आली. पोटापाण्यासाठी गावभर ऑटोरिक्षा चालवण्याचं काम करावं लागलं; पण अशा स्थितीतही गुरूकडून घेतलेला समाजकार्याचा वसा सोडला नाही.

Rickshaw puller's hand for criminals | आपद्ग्रस्तांसाठी रिक्षाचालकाचा मदतीचा हात!

आपद्ग्रस्तांसाठी रिक्षाचालकाचा मदतीचा हात!

Next
वाशिम  : पदव्युतर शिक्षण घेऊनही बेरोजगारी नशिबी आली. पोटापाण्यासाठी गावभर ऑटोरिक्षा चालवण्याचं काम करावं लागलं; पण अशा स्थितीतही गुरूकडून घेतलेला समाजकार्याचा वसा सोडला नाही. एरव्ही अपघातस्थळी जाण्यासही कुणी धजावत नाही. मंगरूळपीर तालुक्यातील हा पोस्ट ग्रॅज्युएट ड्रायव्हर मात्र अपघातात जखमी झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्यांना रुग्णालयार्पयत पोहोचविण्याचे काम कर्तव्यभावनेने करतो आहे.
आदर्श गाव वनोजा येथील घनश्याम गावंडे (40) यांचे संपूर्ण शिक्षण गावातच झाले.  महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना प्राचार्य भा. वा. चौखंडे यांच्या समाजसेवेमुळे गावंडे यांना प्रेरणा मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळेल ती नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आणि संधी मिळेल तेव्हा गरजवंतांच्या मदतीला धावून जायचा निश्चय त्यांनी त्या वेळीच केला; परंतु कला शाखेची पदव्युतर पदवी घेऊनही नोकरीच्या विषयावर त्यांच्या पदरी निराशाच आली. कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी त्यांनी 2क्क्7मध्ये वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन ऑटोरिक्षा विकत घेतली. वनोजा ते शेलूबाजार यादरम्यान प्रवासी ने-आण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आह़े अशा परिस्थितीतही समाजकार्याचा वसा जपता येईल का, याचा विचार त्यांच्या डोक्यात सुरूच होता.
 दरम्यान, अपघातात कुणी मृत्युमुखी पडल्यास, त्याचा मृतदेह शवविच्छेदनगृहार्पयत नेण्यासाठी पुढे येण्याचे धाडस कुणी करीत नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. जे काम कुणी सहसा करीत नाही, ते काम आपण करावं, असा निर्धार गावंडे यांनी 2क्क्8मध्ये केला. 
शेलूबाजार हे वाशिम जिल्ह्यातील एक गाव आहे. अकोला, वाशिम, मंगरुळपीर या महत्त्वाच्या शहराला जोडणारे रस्तेही याच गावातून जातात. त्यामुळे परिसरात अपघात होतच राहतात. या मार्गावर अपघात झाला की, मृताचे शव मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहार्पयत पोहोचविण्याचे काम गावंडे यांनी सुरू केले; तसेच अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवून पोलिसांची मदत करण्याचे कामही गावंडे हिरिरीने करतात. सहा वर्षापासून गावंडे हे काम करीत असल्याने, ते आपद्ग्रस्तांचे मदतगार म्हणून परिसरात परिचित झाले आहेत. (प्रतिनिधी)
 
मृतदेहाला हात लावण्याचे धाडस सहसा कुणी करीत नाही. अशावेळी अपघातग्रस्तांना होईल तेवढी मदत पुरवून पोलिसांना मदत करण्याचे काम मी करतो. यातून समाजाची सेवा केल्याचे सुख मला मिळते. 
- घनश्याम गावंडे,
ऑटोचालक, वनोजा 
 
कर्ज घेऊन ऑटोरिक्षा विकत घेतली. वनोजा ते शेलूबाजार यादरम्यान प्रवासी ने-आण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आह़े अशा परिस्थितीतही समाजकार्याचा वसा जपता येईल का, याचा विचार त्यांच्या डोक्यात सुरूच होता. त्यातूनच घनश्यामला मार्ग मिळाला.

 

Web Title: Rickshaw puller's hand for criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.