रिक्षाचालकांनी बुजविले खड्डे

By admin | Published: July 10, 2017 02:39 AM2017-07-10T02:39:28+5:302017-07-10T02:39:28+5:30

मालाड पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत असणारा हमरस्ता जो दफ्तरी रोड म्हणूनही ओळखला जातो.

Rickshaw pullers piled up | रिक्षाचालकांनी बुजविले खड्डे

रिक्षाचालकांनी बुजविले खड्डे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाड पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत असणारा हमरस्ता जो दफ्तरी रोड म्हणूनही ओळखला जातो. हा मार्ग गेल्या बारा महिन्यांपासून खड्डेमय आणि धुळीने भरलेला असे. पुष्पा पार्क हायवे रिक्षा स्टँड ते समुद्रा हॉटेलपर्यंत मार्गावर खड्डे पडून मार्गाची चाळण झाली होती. प्रवास करताना नागरिकांना आणि नेहमीच्या रिक्षाचालकांना त्रास होत असे. खड्डेमय मार्गामुळे एक ते दोन तास वाहतूककोंडी नेहमी होत असते. या त्रासाला कंटाळून रिक्षाचालकांनी स्वत: पाऊले उचलून खड्डेमय मार्ग बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
कुरारमधील राइट रिक्षा स्टँड, रमेश रिक्षा स्टँड आणि ओमकार रिक्षा स्टँड या रिक्षावाल्यांनी महापालिकेला पत्रव्यवहार करून तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनदेखील याकडे लक्ष दिले नाही. परंतु महापालिका आपल्या सोयीनुसार काम करताना दिसत आहे. मार्गावर बसविलेले पेव्हर ब्लॉक उखडलेल्या अवस्थेत असल्यामुळे जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या वेळी विभागातील वेगवेगळ्या रिक्षा स्टँडवरील रिक्षाचालकांनी एकत्र येऊन स्वत:हून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. सिमेंट, वाळू व विटांचे तुकडे यांनी खड्डे भरून मार्गाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. यावेळी, इस्माईल शेख, विजय डोंगरे, इकबाल शेख, विनोद जगताप, रवी खैरनार, शशिकांत कदम आणि शरद नलावडेकर या रिक्षाचालकांनी पुढाकार घेतला. दरम्यान, खड्डे दुरुस्तीच्या कामासाठी २५ ते ३० रिक्षाचालक आणि इतर लोक कार्यरत होते.

Web Title: Rickshaw pullers piled up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.