रिक्षा-टॅक्सी, बसचालकांच्या मनमानीला बसणार चाप
By admin | Published: February 27, 2017 01:43 AM2017-02-27T01:43:02+5:302017-02-27T01:43:02+5:30
प्रवाशांशी गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी,आॅटोरिक्षा, सार्वजनिक प्रवासी बसचालकांविरोधात मुंबईकरांकडून टोल फ्री हेल्पलाइनवर नेहमीच तक्रारींचा पाऊस पाडला जातो
मुंबई : प्रवाशांशी गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी,आॅटोरिक्षा, सार्वजनिक प्रवासी बसचालकांविरोधात मुंबईकरांकडून टोल फ्री हेल्पलाइनवर नेहमीच तक्रारींचा पाऊस पाडला जातो. टोल फ्री हेल्पलाइनवर पडणारा ताण पाहता आरटीओने त्याला आणखी दोन हेल्पलाइनची जोड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर त्वरित कारवाई करणे सोपे जाईल. तक्रारींसाठी 0२२-२३५३४३२0 आणि 0२२-२३५३४३२२ हे दोन नवीन हेल्पलाइन नंबर असल्याची माहिती आरटीओकडून देण्यात आली.
मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, सार्वजनिक प्रवासी बसचालकांविरोधात प्रवाशांशी गैरवर्तणूक केल्याच्या तक्रारी आरटीओच्या टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध होतात. प्रवाशांना भाडे नाकारणे, उद्धट वर्तणूक, अवाजवी भाडे मागणे, बस थांब्यावर न थांबवणे यांसारख्या तक्रारी आरटीओकडे प्राप्त होतात. प्रवाशांना तक्रार करता यावी यासाठी १८00-२२0११0 हा टोल फ्री क्रमांकही मुंबईकरांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या क्रमांकावर २४ तास सार्वजनिक सेवा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध तक्रार नोंदविता येते. २0११-१२ ते २0१५-१६ या पाच वर्षांत ताडदेव, अंधेरी आणि वडाळा आरटीओत एकूण १४ हजार ९४७ तक्रारींची नोंद झाली आहे. ताडदेव आरटीओत एकूण ३ हजार ९१, अंधेरी आरटीओत ७ हजार ३३0 आणि वडाळा आरटीओमध्ये ४ हजार ५२६ तक्रारी दाखल झाल्या. २0१५-१६मध्ये एकूण १ हजार १२९ परवाना निलंबन करण्यात आले आहेत. सध्याच्या टोल फ्री नंबरवर पडणारा ताण पाहता आरटीओने आणखी दोन हेल्पलाइन नंबर सुरू करण्याचा निर्णय घेतला़ हे नंबर उपलब्धही करण्यात आले आहेत. नवीन नंबरवर तक्रार केल्यास त्वरित कारवाई केली जाईल, अशी माहिती आरटीओकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
>ताडदेव आरटीओंतर्गत २0१६च्या एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत टोल फ्री नंबरवर आलेल्या विविध तक्रारींनंतर २६४ टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आली. यात १५४ टॅक्सीचालकांवर निलंबनाची, तर ११0 टॅक्सीचालकांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली. जवळपास ३ लाख ४ हजार ५00 रुपये दंडही वसूल करण्यात आला.
>आरटीओत प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती
वर्ष ताडदेवअंधेरीवडाळा
२0११-१२ १,0१९२,४0९१,९२५
२0१२-१३ ६0११,१६0१,१६९
२0१३-१४ ५५९४१६४५५
२0१४-१५ ४९७२,९२८६५0
२0१५-१६ ४१५४१७३२७