रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये मतभेद!

By admin | Published: April 30, 2015 02:00 AM2015-04-30T02:00:39+5:302015-04-30T02:00:39+5:30

रस्ते वाहतूक सुरक्षा विधेयकाच्या विरोधात सार्वजनिक उपक्रमातील परिवहन कामगारांनी गुरुवारी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे.

Rickshaw-taxi association differences! | रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये मतभेद!

रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये मतभेद!

Next

मुंबई : रस्ते वाहतूक सुरक्षा विधेयकाच्या विरोधात सार्वजनिक उपक्रमातील परिवहन कामगारांनी गुरुवारी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. हा संप राज्यात मोठ्या प्रमाणात होणार असला तरी मुंबईत संप यशस्वी होईल का, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपात सार्वजनिक वाहतूक क्षेत्र, रिक्षा आणि टॅक्सी सामील होणार असले तरी संपावरून मुंबईत रिक्षा-टॅक्सी युनियनमधले मतभेदही उघड झाले आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने सुरक्षा विधेयकातील टप्पा वाहतुकीचा प्रस्ताव तयार करून १३ सप्टेंबर २०१४ रोजी वेबसाइटवर प्रसिद्ध केला. त्यानंतर १६ आॅक्टोबरपर्यंत या नवीन प्रस्तावावर देशातील सार्वजनिक, खासगी वाहतूकदार आणि युनियनकडून हरकती मागविण्यात आल्या. या प्रस्तावात सर्व सार्वजनिक वाहतूक उपक्रमांनी स्पर्धेत उतरावे, असे म्हटले असून मार्ग भाड्याने देण्याची तरतूद केली आहे. हे मार्ग निविदा मागवून भाड्याने देण्यात येणार आहेत. मात्र यामुळे फायद्यात चालणारे सर्व मार्ग बड्या वाहतूक कंपन्या घेण्याची शक्यता आहे. तर सार्वजनिक वाहतूक सेवांच्या वाट्याला तोट्यातील मार्ग येतील, अशी भीती सर्वच सार्वजनिक वाहतूक सेवांना आहे. हा संप जरी पुकारण्यात आला असला तरी त्यावरून मात्र मतभेद उघड होत आहेत. एसटीतील मान्यताप्राप्त संघटनेने संपाला उघडपणे पाठिंबा न देता छुपाच पाठिंबा देणे पसंत केले आहे. तर एसटीतील अन्य संघटनांनीही विधेयकाला विरोध असल्याचे सांगत संपात मात्र सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. संपावरून मुंबईतील रिक्षा-टॅक्सी युनियनमध्येही मतभेद असल्याचे उघड झाले आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियन, स्वाभिमान टॅक्सी संघटनांसह अन्य टॅक्सी संघटनांनी संपात सामील होणार नसल्याचे सांगितले.

पोलीस सरंक्षणात ‘बेस्ट’ धावणार
च्रस्ता सुरक्षा विधेयक २०१४ विरोधात देशव्यापी आंदोलनात बेस्ट सहभागी होणार नाही़ याउलट मुंबईकर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, अशी भूमिका बेस्ट संघटनांनी घेतली आहे. मात्र यात बेस्ट वर्कर्स युनियन सहभागी असल्याने बेस्ट प्रशासन उद्या पोलीस संरक्षणात बसगाड्या रस्त्यावर काढणार आहे़
च्नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्स्पोर्ट वर्कर्सच्या वतीने कामगार, सार्वजनिक वाहतूक क्षेत्र, टॅक्सी-रिक्षा यांचे उद्या देशव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे़ यामध्ये बेस्ट कामगार संघटनाही उतरणार असल्याने प्रवशांचे हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे़ परंतु या संपात शिवसेनेच्या संघटना सहभागी नाहीत़ संपकाळात बस रस्त्यावर धावण्याची खबरदारी बेस्ट प्रशासन घेणार आहे़ नेहमीप्रमाणे उद्या सर्व बसमार्गांवर बस गाड्या चालविण्यात येणार आहेत़

च्मात्र आंदोलकांकडून दगडफेक अथवा अडथळे येण्याची शक्यता नकारता येत नाही़ म्हणून बसगाड्यांना लोखंडी जाळ्या लावण्यात येणार आहेत़ तसेच बसगाड्यांना व बस आगारांमध्ये पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशी विनंतीही महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी पोलिस आयुक्तांना केली आहे़ त्यानुसार आवश्यकतेनुसार पोलिसांची कुमक पाठविण्यात येणार आहे़

कारवाईचे संकेत : उद्या सर्व कामगारांनी विशेषत: बस चालक व
वाहकांनी ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश बेस्टने दिले आहेत़ तसेच संपात सहभागी होणाऱ्या कामगार-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,
अशी सक्त ताकीद बेस्ट प्रशासनाने दिली आहे़

आमच्या युनियनच्या टॅक्सी रस्त्यावर धावतील. विधेयकाला विरोध आहे. मात्र संप पुकारून प्रवाशांना अडचणीत आणणार नाही.
- ए.एल.क्वाड्रोस
मुंबई टॅक्सीमेन्स
युनियन, महासचिव

विधेयकाला आमचा विरोध असला तरी संपात आम्ही सामील होणार नाही.
-तंबी कुरीयन,
मुंबई रिक्षामेन्स युनियन

भारतीय कामगार सेनेचाही पाठिंबा
भारतीय प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट मजदूर महासंघातर्फे विधेयकाविरोधात भारत बंदची हाक देण्यात आली असून, भारतीय टॅक्सी-रिक्षाचालक महासंघातर्फे समर्थन देण्यात येत आहे.

संपात सामील होण्याचा प्रश्नच येत नाही. प्रवाशांना अडचणीत का आणायचे, हाच आमचा प्रश्न असून संपाला अन्य मार्गानेही विरोध केला जाऊ शकतो.
- के.के.तिवारी, स्वाभिमान टॅक्सी संघटना
केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाहतूक धोरणााला विरोध आहे, पण या संपात एसटी कर्मचारी सहभागी होणार नाही. आधीच एसटी तोट्यात आहे. अशा परिस्थितीत संप पुकारून एसटीला अजून अडचणीत आणणे योग्य नाही.
- श्रीरंग बरगे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस
संपात अन्य रिक्षा-टॅक्सी संघटना सहभागी होणार नसल्या तरी आम्ही त्याकडे दुर्लक्षच केले आहे. या लहान संघटना असून त्याचा दबदबा नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोलणेच योग्य आहे. - उदयकुमार आमोणकर, नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्सपोर्ट वर्कर्सचे निमंत्रक

Web Title: Rickshaw-taxi association differences!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.