रिक्षा-टॅक्सीचालकांचा उर्मटपणा सुरूच

By admin | Published: June 15, 2015 02:49 AM2015-06-15T02:49:05+5:302015-06-15T02:49:05+5:30

रिक्षा-टॅक्सीचालकांचा उद्दामपणा सुरूच असून त्यांच्याविरोधात भाडे नाकारण्याच्या वाहतूक पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.

Rickshaw-Taxi drivers' fervor prevailed | रिक्षा-टॅक्सीचालकांचा उर्मटपणा सुरूच

रिक्षा-टॅक्सीचालकांचा उर्मटपणा सुरूच

Next

मुंबई : रिक्षा-टॅक्सीचालकांचा उद्दामपणा सुरूच असून त्यांच्याविरोधात भाडे नाकारण्याच्या वाहतूक पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. गेल्या पाच वर्षांत तब्बल ५७ हजार तक्रारी आल्याचे सांगण्यात आले.
इंधनाचे दर आणि अन्य खर्च वाढताच रिक्षा-टॅक्सीचालकांकडून भाडेवाढ मागण्यात येते. यासाठी रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून आंदोलनाचेही हत्यार उपसले जाते आणि त्यांच्या सोयीनुसार भाडेवाढही दिली जाते. ही भाडेवाढ दिल्यानंतरही चालकांचा उर्मटपणा किंवा उद्दामपणा बंद होईल, अशी आशा प्रवाशांना असते. मात्र चालकांचा उर्मटपणा काही बंद होताना दिसत नाही. गेल्या पाच वर्षांत तब्बल ५७ हजार ५१ तक्रारी रिक्षा-टॅक्सीचालकांविरोधात आल्या असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
२0११ मध्ये तब्बल २२ हजार २१ तक्रारी आल्या होत्या. तर २0१५ च्या मे महिन्यापर्यंत तब्बल ७ हजार ७११ तक्रारी आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या वर्षात त्यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील मोठी झाली असून, एकूण २ लाख १६ हजार ९00 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. अजून वर्ष संपण्यास सहा महिने बाकी असून, तक्रारी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Rickshaw-Taxi drivers' fervor prevailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.