उद्योग विभागावर खडसेंचा हल्लाबोल, आठ दिवसांत माहिती द्या; अध्यक्षांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:44 AM2017-08-05T01:44:58+5:302017-08-05T01:45:03+5:30
एमआयडीसीने शेतक-यांच्या किती जमिनी मोकळ्या केल्या किती संपादित केल्या याची माहिती मी एक वर्षापासून मागतोय; पण मला ती दिली जात नाही, माहिती दडविली का जात आहे, असा संतप्त सवाल करीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज उद्योग विभागावर हल्लाबोल केला.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एमआयडीसीने शेतक-यांच्या किती जमिनी मोकळ्या केल्या किती संपादित केल्या याची माहिती मी एक वर्षापासून मागतोय; पण मला ती दिली जात नाही, माहिती दडविली का जात आहे, असा संतप्त सवाल करीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज उद्योग विभागावर हल्लाबोल केला.
विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना खडसे म्हणाले की, सामान्य माणसाला माहिती अधिकारात माहिती दिली जाते; पण मला ती दिली जात नाही. आता तरी ही माहिती दिली जाईल का? अध्यक्षांनी सरकारला तसे निर्देश द्यावे.
या वेळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार हे खडसेंच्या मदतीला धावले. सत्तारूढ पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांना माहिती दिली जात नसेल तर बाकींचे काय, माहिती देण्याबाबत सरकार बोटचेपेपणा का करीत आहे, पाणी कुठे मुरतेय असा सवाल त्यांनी केला.
ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी माहिती न देणाºया अधिकाºयाला दंड केला पाहिजे, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, एमआयडीसीच्या जमीन घोटाळ्यांवरून आता उद्योग खाते वादाच्या भोवºयात सापडले आहे. यावर, खडसे यांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी माहिती देण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी सरकारला दिले.