महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरुन मृत्यू

By admin | Published: March 10, 2017 08:52 AM2017-03-10T08:52:23+5:302017-03-10T08:53:48+5:30

लेह-श्रीनगर मार्गावरील दराज येथे महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे

Riding in the snow in Maharashtra | महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरुन मृत्यू

महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरुन मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 10 - लेह-श्रीनगर मार्गावरील दराज येथे महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. जवान महादेव तुपारे असं या जवानाचं नाव असून चंदगड तालुक्यातील महिपाळगडचे ते रहिवासी आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळतात संपुर्ण चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 8 मार्च रोजी ही घटना घडली. 
 
सैन्यात क्लार्क पदावर कार्यरत असणारे महादेव तुपारे 16 कुमाँऊ रेजिमेंटमध्ये उत्तराखंड येथे सैन्यात 2005 साली भरती झाले होते. महादेव तुपारे यांच्या निधनाती बातमी सैन्यातील अधिका-यांनीच त्यांच्या कुटुंबियांना कळवली. ही बातमी कळताच कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. 
 
लेह-श्रीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून महादेव यांचं पार्थिव पोहचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: Riding in the snow in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.