आंबेनळी घाटात दरड कोसळली

By admin | Published: September 21, 2016 03:21 AM2016-09-21T03:21:37+5:302016-09-21T03:21:37+5:30

ग्रामपंचायत हद्दीत पोलादपूरपासून अंदाजे ३६ किलोमीटर अंतरावर आंबेनळी घाटात जननी माता मंदिराजवळ दरड कोसळली.

The rift in the adjoining valley collapsed | आंबेनळी घाटात दरड कोसळली

आंबेनळी घाटात दरड कोसळली

Next


पोलादपूर : पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर मेटतले ग्रामपंचायत हद्दीत पोलादपूरपासून अंदाजे ३६ किलोमीटर अंतरावर आंबेनळी घाटात जननी माता मंदिराजवळ दरड कोसळली. यामुळे भरावाबरोबर झाड रस्त्यावर पडल्याने मंगळवारी सकाळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र जेसीबीच्या सहाय्याने दगड, मातीचा आलेला भराव आणि झाड बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. या घाटातील रस्त्यांना भल्या मोठ्या भेगाही पडलेल्या आहेत. संततधार पावसामुळे महाबळेश्वर-पोलादपूर घाटाची दुरवस्था झाली आहे. यामुळे दरड कोसळण्याच्या घटना येथे घडत असल्याचे येथील नागरिक आणि प्रवाशांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
>मातीची दरड कोसळली
आगरदांडा/ मुरुड : जोरदार वारा व पावसामुळे मुरुड तालुक्यातील सावली गावाच्या वरील भागातील मातीचा धस जना हरी पाटील यांच्या घराजवळ कोसळला मात्र सिमेंटच्या भिंतीमुळे अडविला गेल्याने हानी झाली नाही. मुरुड तहसीलदार योगिता कोल्हे यांनी तातडीने दखल घेत सावली गावास भेट देऊन दुर्घटनेची पाहणी केली. ग्रामस्थांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचे आदेश दिले.

Web Title: The rift in the adjoining valley collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.