आपमध्ये दरार, अंजली दमानियांचा पक्षाला रामराम
By Admin | Published: June 5, 2014 10:38 AM2014-06-05T10:38:07+5:302014-06-05T13:17:04+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षातील दरार वाढली असून पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्या अंजली दमानिया या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ५ - लोकसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षातील दरार वाढली असून पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्या अंजली दमानिया या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तत्वांशी तडजोड करणार नसल्याचे सांगत आपण पक्षाशी सर्व संबंध संपवत असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दमानिया आपच्या स्थानिक नेत्यांवर नाराज असून त्यांनी 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर कमालीच्या नाराज आहे असलेल्या दमानिया यांनी नेत्यांकडून अपेक्षीत सहकार्य मिळत नसल्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. 'अरविंद केजरीवाल हे आपल्याला मोठ्या भावासारखे असून आपण त्यांच्या हितचिंतक आहोत' असे दमनिया यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आपण आपल्या तत्वांशी कधीच तडजोड केली नाही व यापुढेही करणार नाही असे सांगत आपण पक्षाशी असलेले सर्व संबंध संपवत असल्याचेही दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान पक्षाचे नेते मयांक गांधी यांनी मात्र दमानिया आपमध्येच राहणार असल्याचे सांगितले.