अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सक्तमजुरी
By Admin | Published: January 17, 2017 08:43 PM2017-01-17T20:43:14+5:302017-01-17T20:55:05+5:30
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी ३ वर्षे सक्तमजुरी आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी ३ वर्षे सक्तमजुरी आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बाळासाहेब उर्फ प्रताप सुखदेव कांबळे (वय २८, रा. निमोणे, ता. शिरुर ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी ६ जणांची साक्ष नोंदविली.
हा गुन्हा मे २०१५ मध्ये घडला होता. या गुन्ह्यातील पिडीत मुलगी आणि तिचा भाऊ घरात झोपले होते. तेव्हा आरोपी घरात घुसला. त्याने अल्पवयीन मुलीला दुसऱ्या खोलीत नेण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करीत आरडा ओरडा केला आणि ती घराबाहेर पळत गेली. तेव्हा शेजाऱ्यांना माहिती देत, त्यांच्या मोबाईलवरून आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला होता.
या प्रकरणी न्यायालयाने कांबळे याला विनयभंग केल्याबद्दल १ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, तसेच अनाधिकाराने घरात शिरल्याबद्दल २ वर्षे आणि बाल लैगिंक अत्याचार कलम ७ व ८ अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे़