८ कोटीहून अधिक मतदारराजा बजावणार हक्क

By admin | Published: October 14, 2014 03:02 AM2014-10-14T03:02:12+5:302014-10-14T03:02:12+5:30

राज्यातील १८ वर्ष पूर्ण केलेला मतदारराजा उद्या १५ तारखेला आपला लाखमोलाचा मतदानाचा अधिकार बजावेल.

The rights to play more than 8 crore voters | ८ कोटीहून अधिक मतदारराजा बजावणार हक्क

८ कोटीहून अधिक मतदारराजा बजावणार हक्क

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - राज्यातील १८ वर्ष पूर्ण केलेला मतदारराजा उद्या १५ तारखेला आपला लाखमोलाचा मतदानाचा अधिकार बजावेल. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यातील ८ कोटी ३५ लाख मतदार बुधवारी ४, ११९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील.   
यंदा राज्यात सर्व पक्ष स्वबळावर लढत असल्याने निवडणुक पंचरंगी तर काही ठिकाणी बहूरंगी झाली आहे. निवडणुकीचा प्रचार आता संपला असून उद्या मतदान होणार आहे. एकूण मतदारांपैकी चार कोटीहून अधिक पुरुष मतदार असून जवळपास साडे तीन कोटीहून अधिक महिला मतदार आहेत. २८८ जागांसाठी ३,८४८ पुरुष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून केवळ २७६ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील २८८ मतदार संघांपैकी २३४ जागा या खुल्या प्रवर्गातील आहेत. तर, २९ जागा अनुसुचित जातींसाठी असून २५ जागा या अनुसुचित जमातीसाठी  राखीव आहेत. 
८३ मतदार संघात १६ हून अधिक मतदार उभे आहेत, तर एका मतदार संघात ३२ हून अधिक उमेदार आहेत. नांदेड दक्षिण येथील विधानसभा क्षेत्रात ८७ उमेदवार निवडणुकीकरता उभे राहिले आहेत. तर अकोला येथे २१६ उमेदवारांपैकी ५ उमेदवार हे भटक्याविमुक्त  गटातील आहेत. तर, २६४ पैकी ५  उमेदवार गुहागर येथे उमेदवार हे भटक्या विमुक्त जमातीतील आहेत. निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजेच २८७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्याखालोखाल २८२ उमेदवारांसह शिवसेनेचा दुसरा क्रमांक लागतो. तर भाजपचे २८० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  बहूजन समाज पक्षाचे २६०, कम्युनिटस्ट पार्टी ऑफ इंडियाचे २३४, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे १९ उमेदवार उभे आहेत. मनसे मधून २१९ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्ष वगळून नोंदणीकृत पक्षांचे ७६१ उमेदवार तर १६९९ अपक्ष उमेदवार आहेत. राज्यभरात एकूण ४,११९ उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे. 
पुणे जिल्ह्यातील चिंचवड हे राज्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ ठरला आहे. चिंचवडमध्ये तब्बल ४,८४,०८० मतदार आहेत. राज्यातील सर्वात लहान मतदार संघ म्हणून ख्याती असलेल्या वडाळा मतदार संघात १ लाख ५० हजारांहून अधिक मतदार या मतदार क्षेत्रात आहेत. 
बुधवारी होणा-या मतदानासाठी निवडणूक यंत्रणाही सज्ज झाली आहे. राज्यात १३५ सामान्य निरीक्षक तर, खर्चावर निरीक्षण ठेवण्यासाठी ११२ पथकं नेमण्यात आली आहेत. तर जागरुकता निरीक्षक म्हणून १८ पथकं कार्यरत आहेत. तसेच मतदानासाठी राज्यभरात ५, ८४, ६१७ कर्मचारी कार्यरत आहेत.  तर, ९१ हजार तीनशे ७६ मतदान केंद्र आहेत

 

Web Title: The rights to play more than 8 crore voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.