‘हनुमान चालीसाच्या नावे दंगलीचा कट’; इंटेलिजन्सच्या हाती भक्कम पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 09:34 AM2022-04-17T09:34:09+5:302022-04-17T09:39:25+5:30

यासंदर्भातील पुरावे इंटेलिजन्सच्या हाती लागले असून, गृहमंत्रालय त्यावर काम करीत आहे, अशी पुष्टी जोडत दंगलींचा आधार घेऊन राज्यपालांकरवी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचाही प्रयत्न यामागे असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

‘Riot plot in the name of Hanuman Chalisa’ Strong evidence in the hands of intelligence | ‘हनुमान चालीसाच्या नावे दंगलीचा कट’; इंटेलिजन्सच्या हाती भक्कम पुरावे

‘हनुमान चालीसाच्या नावे दंगलीचा कट’; इंटेलिजन्सच्या हाती भक्कम पुरावे

googlenewsNext

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अनेकविध प्रयत्न करूनही यश येत नसल्याचे पाहून भाजप निराश व वैफल्यग्रस्त झाला असून, राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी भोंग्याचे वाटप करून तणाव निर्माण करायचा व नवहिंदू ओवेसी विरुद्ध खरा हिंदू यांच्यात दंगली घडवून महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा कट शिजत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. 

यासंदर्भातील पुरावे इंटेलिजन्सच्या हाती लागले असून, गृहमंत्रालय त्यावर काम करीत आहे, अशी पुष्टी जोडत दंगलींचा आधार घेऊन राज्यपालांकरवी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचाही प्रयत्न यामागे असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. नाशिक भेटीवर आलेल्या संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर थेट, तर राज ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. 

सध्या जे पोथी ठेवून हनुमान चालीसा वाचत आहेत, त्यांना हनुमान चालीसाविषयी एवढीच धार्मिकता आहे तर चालीसा त्यांच्या तोंडपाठ असायला हवी होती, असा टोला लगावून राष्ट्रगीत, वंदे मातरम ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी आता हनुमान चालीसाविषयी ढोंग सुरू केल्याचा आरोपही राऊत यांनी केला. 

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाने भोंग्याचे राजकारण संपुष्टात आणल्याचे सांगून  निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भोंगे वाटप व हनुमान चालीसा वाचनाचे घाणेरडे राजकारण केले, असेही ते म्हणाले.
 

Web Title: ‘Riot plot in the name of Hanuman Chalisa’ Strong evidence in the hands of intelligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.