बुधवारी ठरणार ‘रायसोनी नटसम्राट’

By admin | Published: March 14, 2016 01:08 AM2016-03-14T01:08:58+5:302016-03-14T01:08:58+5:30

सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे आणि परिसरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट घेऊन आली आहे

Rishoni Natsamrut to be decided on Wednesday | बुधवारी ठरणार ‘रायसोनी नटसम्राट’

बुधवारी ठरणार ‘रायसोनी नटसम्राट’

Next

पुणे : सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे आणि परिसरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट घेऊन आली आहे ‘रायसोनी नटसम्राट’ एकपात्री स्पर्धा. रायसोनी ग्रुपच्या सहकार्याने ही स्पर्धा बुधवारी (दि. १६) होणार आहे.
प्रत्येक मुला-मुलीत चांगले कलागुण असतात. करिअरला कलागुणांची जोड मिळाल्यास यश हे निश्चित असते. त्यामुळे मुलांना स्वत:मधील कलागुण ओळखून त्या आधारे करिअरची निवड केल्यास आवडीच्या क्षेत्रात भविष्यात यश मिळविणे शक्य होते.
युवा नेक्स्टच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांचे मनोरंजन हाच केवळ उद्देश नसून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणे हा सुद्धा आयोजनामागील उद्देश असतो.
‘लोकमत’च्या या विविधि उपक्रमांतर्गतच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘रायसोनी नटसम्राट’ या एकपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी तीन मिनिटे देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या नाटकातील एक प्रवेश या वेळी सादर करायचा आहे. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘रायसोनी नटसम्राट’ या उपाधीने गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना अनेकविध पारितोषिक देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rishoni Natsamrut to be decided on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.