वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव, कथित १२ ऑडियो क्लीपमुळे संशयाचे वातावरण अधिक गडद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 02:50 AM2021-02-14T02:50:20+5:302021-02-14T06:40:54+5:30

Pooja Chavan suicide case: राज्य मंत्रिमंडळाच्या दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीलाही संजय राठोड हजर नव्हते. आपल्या खात्याच्या बैठका व कार्यक्रमही त्यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

Rising pressure for Forest Minister Sanjay Rathore's resignation, 12 audio clips darken suspicion | वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव, कथित १२ ऑडियो क्लीपमुळे संशयाचे वातावरण अधिक गडद

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव, कथित १२ ऑडियो क्लीपमुळे संशयाचे वातावरण अधिक गडद

Next

मुंबई : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने केली असतानाच सोशल मीडियात व्हायरल झालेल्या कथित १२ ऑडिओ क्लिप्समुळे राठोड यांच्याभोवतीचे संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे. क्लिपमधील आवाज त्यांचाच आहे का, याची फोरॅन्सिक लॅबमध्ये चाचणी करण्याची मागणीही भाजपने केली. यावर राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते ‘नॉट रिचेबल’ आहेत.
ते मुंबईतील बंगल्यावर नाहीत. यवतमाळच्या घरीदेखील नाहीत. त्यांचे मोबाइल स्विच्ड् ऑफ आहेत.  त्यांचे पीए, पीएस फोन घेत नाहीत, घेतलाच तर उडवाउडवीची उत्तरे देतात. राज्य मंत्रिमंडळाच्या दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीलाही ते हजर नव्हते. आपल्या खात्याच्या बैठका व कार्यक्रमही त्यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. मात्र ते मुंबईतच असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राठोड यांच्यावरील आरोपांबाबत बोलण्याचे टाळले. त्याबाबत मुख्यमंत्रीच काय ते सांगतील, असे ते म्हणाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी आहे. पण थेट संजय राठोड यांचे नाव घेणे योग्य ठरणार नाही, माहिती घेतल्यानंतरच बोलणे योग्य राहील. दरम्यान, पूजाच्या बहिणीने टाकलेल्या फेसबुक पोस्टचीही खूप चर्चा आहे.

‘ती’ दोन महिन्यांची गरोदर?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १२ ऑडिओ क्लिप्स पोलीस महासंचालकांकडे पाठविल्या आहेत. एका क्लिपमध्ये एक तरुणी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे, प्रेगनन्सी टेस्ट केली असल्याचे एक जण सांगतो. त्यावर, तिने तर मला गोळ्या घेतल्या असल्याचे सांगितले होते. म्हणजे ती माझ्याशी खोटं बोलली, माझा विश्वासघात केला, असे दुसरा म्हणतो.

तिच्या डोक्यातून सुसाईडचे काढा
तिच्या डोक्यातून सुसाईडचं तेवढं काढा, आत्महत्या हा इलाज आहे का? ... हो! मी तिला समजावून सांगतोच आहे, तू पण समजावून सांग, काही गडबड व्हायला नको, असे संवाद या एका क्लिपमध्ये आहेत. काहीही कर, हॉस्पिटलमध्ये दोरीने चढून खिडकीतून जा पण तिचा मोबाईल आधी ताब्यात घे, अशी सूचना कथित मंत्री करीत असल्याच्या संवादाचीही क्लिप आहे.

...तर मला आत्महत्या करावी लागेल
प्रकरण वाढले तर राज्यात बोभाटा होईल. तुम्ही दोघेही नामवंत आहात, असे अरुण नावाची एक व्यक्ती एका क्लिपमध्ये म्हणते. त्यावर कथित मंत्री त्याला, प्रकरण मिटव. काहीही कर नाहीतर मला संन्यास घ्यावा लागेल, माझ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येईल, असे सांगतो. 

Web Title: Rising pressure for Forest Minister Sanjay Rathore's resignation, 12 audio clips darken suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.