निवृत्त सैनिकाचा खोडसाळपणा; दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याची अफवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 07:34 AM2019-04-27T07:34:12+5:302019-04-27T09:26:19+5:30
कर्नाटकच्या पोलिसांना ट्रक ड्रायव्हर असलेल्या निवृत्त सैनिकाने फोन करून दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली आहे.
बेंगळूरु : महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा कर्नाटकच्यापोलिस महासंचालकांनी दिला होता. मात्र, चौकशीवेळी हा खोडसाळपणा ट्रक ड्रायव्हर असलेल्या एका निवृत्त सैनिकाने केल्याचे समोर आले आहे. या निवृत्त सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने हा इशारा देताना यावेळी रेल्वेना लक्ष्य केले जाणार असल्याची माहिती दिली होती. यामुळे मुंबईसह राज्यभरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
कर्नाटकच्या पोलिसांना एका व्यक्तीने फोन करून ही माहिती दिली होती. यामध्ये त्याने कर्नाटक, महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये हल्ला करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. तामिळनाडूच्या रामनाथपूरममध्ये 19 दहशतवादी जमले असल्याचा दावाही त्याने केला होता. यामुळे लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा असलेल्या मुंबईमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ही माहिती देताना ट्रक चालकाने त्याचे नाव स्वामी नाथा पूरम असल्याचे सांगितले होते.
Bengaluru Rural SP: It was a hoax call, the 65-year-old lorry driver, Sundara Murthy, a retired Army personnel has been arrested for making the call. #Karnatakahttps://t.co/Rkt3liJUjV
— ANI (@ANI) April 27, 2019
तपासावेळी हा ट्रकचालक निवृत्त सैनिक असल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी अटक केल्याचे बेंगळुरू ग्रामीणचे पोलिस अधिक्षकांनी सांगितले. त्याचे नाव सुरेंद्र मूर्ती असीन ते 65 वर्षांचे आहेत.
Karnataka DG-IGP writes to DGs of Tami Nadu, Kerala, Andhra, Telangana, Puducherry, Goa, Maharashtra following a phone call by a man 'claiming to have info that cities in Tamil Nadu, K'taka, Kerala, Andhra, Telangana, Puducherry, Goa, Maharashtra will be hit by terror attacks'. pic.twitter.com/BcvXBHVX2y
— ANI (@ANI) April 26, 2019
लोकसभा निवडणूक आणि श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने समुद्रतटावरील शहरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये गोवा, मुंबई, गुजरात, कलकत्ता, चेन्नई या शहरांचा समावेश आहे.