पावसाची जोरदार ‘किक’
By admin | Published: July 12, 2014 11:32 PM2014-07-12T23:32:53+5:302014-07-12T23:32:53+5:30
सध्या सर्वत्र फुटबॉल फिव्हर असून काही उशिराने दाखल झालेल्या पावसाने शनिवारी जोरदार ‘किक’ मारली. जिल्ह्यात सर्वत्र रात्रीपासून पाऊस सुरू आहे.
Next
ठाणो : सध्या सर्वत्र फुटबॉल फिव्हर असून काही उशिराने दाखल झालेल्या पावसाने शनिवारी जोरदार ‘किक’ मारली. जिल्ह्यात सर्वत्र रात्रीपासून पाऊस सुरू आहे. यामुळे बहुतांशी ठिकाणी नद्यांना पूर आला असून धरण क्षेत्रंतही उत्तम पाऊस झाला आहे. या वर्षात प्रथमच जिल्ह्यात सर्वाधिक 919.3क् मिमी पाऊस पडला.
ठाण्यामध्ये गेल्या 24 तासांत विक्रमी म्हणजे 152 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. शहरात आजही काही सखल भागात पाणी साचले. शुक्रवारी रात्री नळपाडा येथील नाल्याचे पाणी आजूबाजूच्या घरांमध्ये शिरल्यामुळे 4क् ते 5क् घरांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
ठाणो महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे विविध स्वरूपाच्या 35 तक्रारी प्राप्त आल्या आहेत. यामध्ये झाडे पडण्याच्या 11, फांद्या तुटण्याच्या 11, पाणी साठण्याच्या 4, रस्ता खचण्याची 1, तर इतर प्रकारच्या 14 तक्रारी आल्या. पाटीलवाडी, अझादनगर, चंदनवाडी आदी भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. बी केबिन येथे वृक्ष उन्मळून पडल्याने चार गाडय़ांचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)
तीन दिवस हजेरी
मुरबाड : एकीकडे दुष्काळाचे सावट निर्माण झाले असतानाच गेला सव्वा महिना पाऊस न पडल्याने शेतकरीवर्गाचे अक्षरश: तोंडचे पाणी पळाले होते. परंतु, निसर्गापुढे सर्वच नतमस्तक असतात, असेच म्हणावे लागेल. गेले तीन दिवस पडत असलेल्या पावसाने शेतक:यांमध्ये आनंदी वातावरण दिसून येत आहे.
च्भातसानगर : पावसाची मोठय़ा आतुरतेने वाट पाहात असलेला प्रत्येक जीव शुक्रवारी दिवसभराच्या रिमङिाम तर कधी हलक्या सरींमुळे सुखावला. तब्बल 4क् दिवस या पावसाच्या येण्याची वाट पाण्यातील मासे, खेकडे, बेडूक, कासव या जलचरांसह जमिनीवरील प्राणीही पाहात होते. सतत पडणा:या पावसामुळे नदी, नाले यांना पूर येताच मासे त्या पाण्याबरोबर शेतातील डबक्यांमध्ये अंडी सोडण्यासाठी येतात. खेकडे सहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जमिनीवर चा:यासाठी येत असतात. अर्थात, जलचरांचा हा कालावधी प्रजननाचा असल्याने ते पावसाची वाट पाहात असतात.
च्कल्याण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेला पाऊस आज तिस:या दिवशीही सुरू होता. पावसाला अपेक्षित जोर नसला तरी मुंबईत झालेल्या पावसाचा कल्याण-डोंबिवलीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. शहराच्या अनेक सखल भागांत पाणी साचल्याच्या तक्रारी असल्या तरी कोठेही घरात पाणी शिरल्याची तक्रार नाही, असे महापालिकेच्या आपत्ती निवारण केंद्रातर्फे सांगण्यात आले.
च्शुक्रवारी दिवसभरात बेतुरकरपाडा, शंकरराव चौक ते गांधी चौक मार्गावर व बिर्ला महाविद्यालय भागात झाडे पडल्याच्या तीन तक्रारी आल्या होत्या. जोरदार पावसाने रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने कल्याण-डोंबिवलीतील अनेकांना शुक्रवारी कामावर जाता आले नाही.
तालुकापाऊस
ठाणो152.क्क्
कल्याण86.क्क्
मुरबाड71.क्क्
उल्हासनगर2क्.क्क्
अंबरनाथ78.क्क्
तालुका पाऊस
भिवंडी65.क्क्
शहापूर98.6क्
वसई62.क्क्
जव्हार4क्.क्क्
विक्रमगड33.क्क्
तालुकापाऊस
मोखाडा21.8क्
वाडा55.क्क्
डहाणू25.2क्
पालघर89.4क्
तलासरी53.क्क्