पाकिस्तानी कलाकारांना रितेश देशमुखचा पाठिंबा
By admin | Published: September 24, 2016 09:50 PM2016-09-24T21:50:48+5:302016-09-24T21:50:48+5:30
मुद्दा कोणताही असो, कलाकारांनाच पहिल्यांदा लक्ष्य केलं जातं अशी प्रतिक्रिया अभिनेता रितेश देशमुखने दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना विरोध करत 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. मनसेच्या भुमिकेवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना अभिनेता रितेश देशमुखने पाकिस्तानी कलाकारांची बाजू मांडत त्यांचा बचाव केला आहे. 'मुद्दा कोणताही असो, कलाकारांनाच पहिल्यांदा लक्ष्य केलं जातं,' अशी प्रतिक्रिया अभिनेता रितेश देशमुखने दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांत देश सोडा अन्यथा धडा शिकवू, असं अल्टिमेटम दिलं आहे. 'कलाकार हे सॉफ्ट टार्गेट असतात, जे दुर्दैवी आहे. मुद्दा खरंतर वेगळा असतो, पण हा उपाय नाही. कलाकारांवर बंदी घालणं हाच उपाय असेल तर तो उपाय असूच शकत नाही,' असं रितेश देशमुख बोलला आहे.
रितेश देशमुखचा ‘बँजो’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. रवी जाधवने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात रितेशसोबत मुख्य भुमिकेत असलेल्या नर्गिस फाखरीवरुनही सोशल मिडियावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मूळ पाकिस्तानची असलेल्या नर्गिसचा विरोध का केला जात नाही ? असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.