विधी महाविद्यालयाचे संकेतस्थळ हॅक

By admin | Published: October 10, 2016 10:16 PM2016-10-10T22:16:36+5:302016-10-10T22:21:33+5:30

भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या प्रतिशोधासाठी पाकिस्ताननं आता सायबर हल्ले सुरू केले आहेत.

Ritual College Website Hack | विधी महाविद्यालयाचे संकेतस्थळ हॅक

विधी महाविद्यालयाचे संकेतस्थळ हॅक

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या प्रतिशोधासाठी पाकिस्ताननं आता सायबर हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानी हॅकर्सनी मुंबईतल्या शासकीय विधी महाविद्यालयाचे (http://glcmumbai.com) संकेतस्थळ हॅक केलं आहे. या संकेतस्थळावर गेल्यास पाक सायबर पायरेट्स असा मेसेज दिसत आहे. 

दरम्यान पाकिस्तानी सायबर पायरेट्सकडून हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. या संकेतस्थळावर गेल्यास
national securities depositary limited...OOPPPSS
To all indians out there..surgical strike ...lolx buhahahahhahahahhaha!!!!! ../logout, असा मजकूर दिसत आहे.  

विधी महाविद्यालयाच्या संकेतस्थळ भेट देऊ नका, अन्यथा तुमचा आयपी एड्रेस आणि वैयक्तिक माहिती धोका पोहोचण्याची संभावना आहे, असं आवाहनही विद्यार्थ्यांनी केलं आहे. याआधी पाकिस्तानकडून 7 देशांतील भारतीय दूतावासांच्‍या वेबसाइट हॅकर्स ग्रुपने हॅक केल्‍या होत्या. त्‍यात तुर्की, ग्रीस, मॅक्सिको, ब्राजील, रोमानिया, तजाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.

Web Title: Ritual College Website Hack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.