पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला आला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 11:07 AM2017-07-22T11:07:38+5:302017-07-22T11:07:38+5:30
पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून ९००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Next
धरणातून पाणी सोडल्याने मुठेला पूर
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून ९००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला पूर आला आहे. नदीपात्रातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे.
काल रात्रीपासून 2000 क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती मात्र रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी कायम राहिल्याने टप्याटप्याने पाणी सोडण्याचा वेग वाढविण्यात आला. सध्या 9 हजार क्यूसेक्सने पाणी नदीत येत आहे.
आणखी वाचा
पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या रहिवाशांना इशारा दिला आहे. नदीपात्रातील रस्ताही पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी येथे गाड्या लावू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.