आर.के. लक्ष्मण
By admin | Published: May 5, 2016 05:05 AM2016-05-05T05:05:22+5:302016-05-05T18:03:18+5:30
भारतीय व्यंगचित्रांची ओळख असलेल्या प्रत्येक जण रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांना आर.के. लक्ष्मण या नावानेच ओळखतो. १९५१ मध्ये द टाइम्स आॅफ इंडियात रूजू झालेल्या लक्ष्मण यांनी ‘कॉमन मॅन’
भारतीय व्यंगचित्रांची ओळख असलेल्या प्रत्येक जण रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांना आर.के. लक्ष्मण या नावानेच ओळखतो. १९५१ मध्ये द टाइम्स आॅफ इंडियात रूजू झालेल्या लक्ष्मण यांनी ‘कॉमन मॅन’ आणि दैनंदिन ‘यू सेड इट’ हे व्यंगचित्र अजरामर केले. पद्मविभूषण, पद्मभूषण, रमण मॅगसेसे यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित लक्ष्मण यांच्या स्केचिंगचा सफाईदारपणा अद्वितीय असा होता. विषयांची निवड, त्याची जाण आणि सादरीकरण अजोड असायचे. स्थानिक छोट्या-मोठ्या वृत्तपत्रांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी थोरले बंधू आर.के. नारायणन यांच्या कथा द हिंदूमध्ये चित्रित करण्याचे काम केले. त्यांची द फ्री प्रेस जर्नलमध्ये राजकीय व्यंगचित्रकार म्हणून नियुक्ती होताच, त्यांच्या व्यंगचित्रकार म्हणून पूर्णवेळ कारकिर्दीला प्रारंभ झाला. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे सहकारी व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत होते. आर.के.नंतर टाइम्स आॅफ इंडियाचे अविभाज्य अंग बनले. प्रारंभी त्यांच्या व्यंगचित्रांवर ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांचा प्रभाव राहिला. २६ जानेवारी २०१५ रोजी ९३ व्या वर्षी या महान व्यंगचित्रकाराने अखेरचा श्वास घेतला.