आधुनिक तंत्रज्ञान रोखणार मुंबईतील रस्ते अपघात

By admin | Published: June 9, 2017 02:04 AM2017-06-09T02:04:59+5:302017-06-09T02:04:59+5:30

रस्ते अपघात रोखण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे.

Road accident in Mumbai will prevent modern technology | आधुनिक तंत्रज्ञान रोखणार मुंबईतील रस्ते अपघात

आधुनिक तंत्रज्ञान रोखणार मुंबईतील रस्ते अपघात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रस्ते अपघात रोखण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे. याच तंत्रज्ञानाच्या आधारे अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निश्चित करण्यात येतील. त्यानुसार ब्लॅक स्पॉटमध्ये अपघातांची कारणे, अपघातावेळी असलेली परिस्थिती आणि वाहन चालकांचे दुर्लक्ष यावर उपाययोजना आखल्या जातील, असे आंतरराष्ट्रीय रोड सेफ्टी परिषदेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ७ जूनपासून लोअर परेल येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला १७ देशांतील वाहतूक तज्ज्ञांनी हजेरी लावली आहे.
रस्त्यांवरील अपघातात होणारे मृत्यू हे २०३०पर्यंत जगभरातील एकूण मृत्यूंच्या कारणांपैकी सातव्या क्रमांकाचे कारण ठरणार आहे. मुंबईत गत दोन वर्षांत ११७३ मुंबईकरांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले. यात ८३ टक्के पुरुष आणि १७ टक्के महिलांचा समावेश आहे. व्यावसायिक वाहने आणि दुचाकीस्वारांकडून (एकटा दुचाकी चालवत असताना) प्रत्येकी २७ टक्के अपघात होत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले.रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्याचबरोबर अपघात प्रवण क्षेत्रांची माहिती, सोशल मीडियातून रोड सेफ्टी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च प्रशिक्षित वाहतूक पोलिसांसह ‘ब्लॅक स्पॉट’ रस्ता सांभाळणारी संबंधित यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. ९ जूनपर्यंत ही परिषद सुरूराहणार आहे. परिषदेत विविध देशांच्या वाहतुकीची सद्य:स्थिती, रस्ते अपघात टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांच्यावर चर्चा करण्यात येत आहे. रस्ते अपघाता पडणाऱ्या बळींची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून जनजागृती संदर्भात विविध उपाययोजनादेखील हाती घेण्यात येणार आहेत.
रस्ते अपघातांची कारणेउपाय
वाहनचालकांचा दुर्लक्षितपणावाहतूक नियमांचे पालन करून काळजीपूर्वक वाहन चालवणे
हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे हेल्मेट वापरल्यामुळे ६९ टक्के रस्ते अपघात कमी होतील
सीट बेल्ट न वापरता वाहन चालवणे, सीट बेल्ट वापरामुळे व मद्यपान न करता वाहन चालवण्याने
मद्यपान करून वाहन चालवणे४० ते ६५ रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण रोखता येईल
पायाभूत सुविधांचा अभावरस्त्यांवर पादचारी मार्ग, लेनमार्किंग, जड व हलकी वाहने यांची
स्वतंत्र मार्गिका केल्याने ४० ते ५० टक्के अपघात रोखता येतील
वाहनांची देखभाल व नियमांचीसीट बेल्ट, एअर बॅग अशा अपघात बचाव करणाऱ्या सुविधा
कडक अंमलबजावणी वाहनात असल्यास ६१ टक्के अपघातात मृत्यू टाळता येणे शक्य
मुंबईतील १७ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून,
त्यातील निवडक अपघातप्रवण क्षेत्र पुढीलप्रमाणे

Web Title: Road accident in Mumbai will prevent modern technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.