यंदाच्या वर्षात मुंबईतले रस्ते अपघात घटले

By Admin | Published: September 5, 2014 01:27 AM2014-09-05T01:27:59+5:302014-09-05T01:27:59+5:30

बेदरकार वाहनांमुळे किंवा अन्य कारणांमुळे रस्ते अपघाताचा धोका संभवू शकतो, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून सातत्याने केले जाते.

Road accidents in Mumbai have declined this year | यंदाच्या वर्षात मुंबईतले रस्ते अपघात घटले

यंदाच्या वर्षात मुंबईतले रस्ते अपघात घटले

googlenewsNext
मुंबई : मुंबईकरांनो रस्त्यावरून वाहन चालवताना किंवा चालताना जरा जपून. बेदरकार वाहनांमुळे किंवा अन्य कारणांमुळे रस्ते अपघाताचा धोका संभवू शकतो, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून सातत्याने केले जाते. मात्र वाहतूक पोलिसांच्या जनजागृतीमुळे यंदाच्या वर्षात मुंबईतील रस्ते अपघाताचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 418 अपघात कमी झाले आहेत. 
मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने, बेदरकारपणो वाहन चालवणो किंवा रस्त्यांवरील खड्डे या आणि अशा अन्य कारणांमुळे मुंबईतील रस्त्यांवर अपघात बरेच वाढले होते. त्यामुळे रस्त्यांवरुन चालणोही कठीण होऊन बसले होते. हे पाहता वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत अपघात कमी होण्यासाठी जनजागृती करण्यावर अधिक भर दिला. तसेच अपघात कमी होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये अपघात झालेल्या ठिकाणांची माहिती संकलित करुन अपघात होण्याची कारणो, वेळ आणि ठिकाण यांचा अभ्यास करुन यासंदर्भात अधिका:यांच्या बैठका घेऊन त्याचा आढावा घेतला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमध्ये वाहतूक नियमनासाठी अधिक मनुष्यबळ नेमण्यात आले. 
तसेच रस्त्यांवर अनेक ठिकाणी सूचना फलक, वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी मोहीम आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली. त्याचा फायदा होत यंदाच्या वर्षातील सात महिन्यांत रस्ते अपघातात घट झाली. (प्रतिनिधी)
 
 जानेवारी ते जुलै 2014 मध्ये 309 प्राणांतिक अपघात झाले होते. मागील वर्षीच्या याच महिन्यात 332 प्राणांतिक अपघात झाले. 2014 मधील सात महिन्यांत 12 हजार 836 अन्य अपघात झाले असून मागील वर्षी याच कालावधीत 13 हजार 231 अपघात झाल्याचे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) बी.के. उपाध्याय यांनी सांगितले. 
 
विभागप्राणांतिकअन्य
अपघातअपघात
कुलाबा3579
काळबादेवी194
पायधुनी10148
ताडदेव4559
वडाळा10139
नागपाडा3166
भायखळा9235
भोईवाडा3239
वरळी7430
माहीम11501
माटुंगा16754
चेंबूर18563
ट्रॉम्बे33639
विभागप्राणांतिकअन्य
अपघातअपघात
घाटकोपर20533
विक्रोळी22647
मुलुंड7313
साकीनाका11529
वांद्रे6678
डी.एन.नगर5773
वाकोला301057
एअरपोर्ट6675
गोरेगाव241270
मालाड6231
कांदिवली18489
बोरीवली26 595

 

Web Title: Road accidents in Mumbai have declined this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.