अजिंक्यने बनविले भंगारातून ‘रोड क्लीनर’!

By admin | Published: December 18, 2015 02:04 AM2015-12-18T02:04:43+5:302015-12-18T02:04:43+5:30

तब्बल पाच वर्षांनी मिळाले पेटंट !

'Road Cleaner' made by Ajinkya made of bricks! | अजिंक्यने बनविले भंगारातून ‘रोड क्लीनर’!

अजिंक्यने बनविले भंगारातून ‘रोड क्लीनर’!

Next

अकोला : सध्या पुणे येथे उच्चशिक्षण घेत असलेल्या अकोल्याच्या अजिंक्यने इयत्ता दहावीमध्येच तयार केलेल्या 'रोड क्लीनर' यंत्राचं तब्बल पाच वर्षांनी पेटंट देण्यात आले आहे. भंगार वस्तूंपासून तयार केलेल्या रोड क्लीनरच्या यशामुळे अजिंक्यने अकोल्याच्या वैभवात भर टाकली, हे नक्की.
अकोल्याचा मूळ रहिवासी अजिंक्य दीपक घुमन हा सध्या पुणे येथे पीव्हीपीआयटी व एस.पी.एम. महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. त्याने नुकतीच राष्ट्रीय पातळीवर पेटंट मिळविण्यासाठी परीक्षा दिली असून, यामध्ये तो उत्तीर्ण झाला आहे. ही परीक्षा त्याने तयार केलेल्या 'रोड क्लीनर' या प्रोजेक्टसाठी दिली होती. या प्रोजेक्टचे पेटंट देण्यात आले असले तरी त्यासाठी त्याला तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. अजिंक्य इयत्ता सातवीमध्ये असताना त्याच्या डोक्यात रोड क्लीनरची संकल्पना आली. शालेय अभ्यासासोबतच त्याने रोड क्लीनर यंत्रासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची जुळवाजुळव चक्क भंगारातून केली. उन्हाळ्य़ाच्या सुट्यांमध्ये त्याने प्रोजेक्टच्या प्रत्यक्ष कृतीला प्रारंभ करून तीन महिन्यांच्या कालावधीत 'रोड क्लीनर'ची छोटेखानी प्रतिकृती तयार केली. हसत-खेळत तयार झालेल्या या प्रतिकृतीला विविध स्तरांवरून बक्षिसे प्राप्त झाली. बक्षीस स्वरूपातून प्राप्त झालेल्या निधीतून त्याने प्रत्यक्षात उपयोगी पडणार्‍या 'रोड क्लीनर'च्या निर्मितीचा ध्यास घेतला. त्याचा याची सुरुवात इयत्ता दहावीच्या सुट्यांमध्ये केली. त्यासाठी पुन्हा भंगारातील साहित्याची खरेदी करून रोड क्लीनरचे मोठे यंत्र तयार केले. हे यंत्र तयार करण्यासाठी त्याला एक वर्षाचा कालावधी लागला.
दरम्यान, त्याने फेब्रुवारी २0१५ मध्ये पेटंट मिळविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर परीक्षा दिली होती. नोव्हेंबरमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात अजिंक्यला यश मिळाले.
रोड क्लीनर या प्रोजेक्टला नागपुर, पुणे आणि अमरावती येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये बक्षीस मिळाले आणि त्याच निधीतून पेटंटची परीक्षा दिली. रोड क्लीनर प्रोजेक्टचं पेटंट मिळाले असून, इतर प्रोजेक्टवरही काम सुरू असल्याचे अजिंक्य घुमन याने सांगीतले.

*'रोड क्लीनर' असं करतं काम
रस्त्यावरील कचरा उचलणे, रस्ता पाण्याने पुसणे, रस्त्यावरील गवत, लहान झडपं कापणे आदी कामे हे रोड क्लीनर नामक यंत्र करते. साधारणत: एक किलोमीटरकरिता १0 ते १५ मिनिटे अशा वेगाने हे रोड क्लीनर काम करते.

*इतर प्रोजेक्टच्या पेटंटसाठी तयारी
अजिंक्य घुमनचे रोड क्लीनरसोबतच रोड पॅचर आणि साइड ग्लास क्लीनर या प्रोजेक्टवरही काम सुरू आहे. या प्रोजेक्टचे पेटंट मिळविण्यासाठी अजिंक्य परीक्षेच्या तयारीला लागला आहे.

Web Title: 'Road Cleaner' made by Ajinkya made of bricks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.