प्रचारात रंगणार झोपड्यांसह रस्त्यांचे मुद्दे
By Admin | Published: January 20, 2017 02:16 AM2017-01-20T02:16:15+5:302017-01-20T02:16:15+5:30
महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असून, संभाव्य उमेदवारांसह स्थानिक नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली आहे
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असून, संभाव्य उमेदवारांसह स्थानिक नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. विशेषत: नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करत राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी सुरू केली असून, याचा प्रत्यय महापालिकेच्या के-ईस्ट वॉर्डमध्ये येत आहे. नागरी समस्यांसह झोपड्यांचा पुनर्विकास हा या वॉर्डातील प्रचाराचा मुद्दा असून, यानिमित्ताने प्रतिस्पर्धी उमेदवार राजकीय कुरघोडी करत येथे कोण बाजी मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
के-ईस्टचा बऱ्यापैकी भाग हा पश्चिम उपनगरात मोडत आहे. या वॉर्डमध्ये एकूण १५ प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ७२मध्ये इस्माईल युसूफ कॉलेज, नटवर नगर, बांद्रेकरवाडी, लक्ष्मी नगर या परिसरांचा समावेश आहे. येथे नागरी समस्यांचा अभाव असून, रस्त्यांच्या कामांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रभाग क्रमांक ७३मध्ये श्याम नगर, मजास बस डेपो, जोगेश्वरी गुंफा, जनता कॉलनीचा समावेश आहे. या परिसरात प्रामुख्याने रस्ते हा विषय महत्त्वाचा आहे. प्रभाग क्रमांक ७४मध्ये दुर्गा नगर, रूप नगर, गणेश नगर, कमाल अमरोही स्टुडिओ परिसराचा समावेश आहे. येथे नागरी वस्त्यांमधील सेवा-सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. प्रभाग क्रमांक ७५मध्ये सेव्हन हिल हॉस्पिटल, मरोळ बस डेपो, कदमवाडी, मरोळ, विजय नगर या परिसराचा समावेश असून, मरोळ येथील रस्ते कायमच उखडलेले असल्याचे चित्र असते. प्रभाग क्रमांक ७६मध्ये देवल तलाव, सीप्झ, सुभाष नगर, मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेट, महाकाली गुंफा या परिसराचा समावेश असून, येथे नागरी सुविधांवर लोकप्रतिनिधींनी आणखी भर द्यावा, असे स्थानिकांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ७७मध्ये इन्कम टॅक्सी कॉलनी, मेघवाडी, इंदिरा नगर, कोकण नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ७८मध्ये वांद्रे प्लॉट, झुला मैदान, शिवाजी नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ७९मध्ये शंकरवाडी, होली स्पिरिट रुग्णालय, तोलानी कॉलेज परिसराचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८०मध्ये एम.व्ही. कॉलेज, पारशी कॉलनी, आझाद नगर, बिमा नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८१मध्ये शेर-ए-पंजाब कॉलनी, गुंदवली, एमआयडीसी, मरोळ बस डेपो, हनुमान नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८२मध्ये जे.बी. नगर, अशोक नगर, रामलीला मैदान, साई नगर, ए.ए. आय कॉलनी परिसराचा समावेश आहे. या परिसरात काही ठिकाणी झोपड्या असून, झोपडीधारकांच्या पुनर्वसनाची समस्या येथे प्रामुख्याने भेडसावत आहे. झोपडीधारकांच्या पुनर्वसनासह झोपड्यांमध्ये पुरेशा नागरी सेवा देण्याबाबत रहिवासी आक्रमक असून, हा प्रश्न येथे भेडसावत आहे.
प्रभाग क्रमांक ८३मध्ये आंबेडकर नगर, बामणपाडा, पी अॅण्ड टी कॉलनी, ए.ए. कॉलनीचा समावेश असून, प्रभाग क्रमांक ८४मध्ये कोलडोंगरी, तेजपाल स्कीम, परांजपे स्कीम, नेताजी सुभाष नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८५मध्ये डहाणूकर कॉलेज, शास्त्री नगर, विलेपार्ले परिसराचा समावेश असून, प्रभाग क्रमांक ८६मध्ये छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार गाव, चिमटपाड्याचा समावेश आहे. या प्रभागांमधील काही परिसर विकसित असले तरी सहार गाव आणि परिसरात अद्याप नागरी सेवांचा अभावच आहे. एकंदर या वॉर्डमध्ये रस्ते आणि झोपड्या प्रचाराचा मुद्दा असणार असून, यांचे प्रश्न कोण सोडवणार? हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)
प्रभाग क्रमांक ८३मध्ये आंबेडकर नगर, बामणपाडा, पी अॅण्ड टी कॉलनी, ए.ए. कॉलनीचा समावेश असून, प्रभाग क्रमांक ८४मध्ये कोलडोंगरी, तेजपाल स्कीम, परांजपे स्कीम, नेताजी सुभाष नगरचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८५मध्ये डहाणूकर कॉलेज, शास्त्री नगर, विलेपार्ले परिसराचा समावेश असून, प्रभाग क्रमांक ८६मध्ये छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार गाव, चिमटपाड्याचा समावेश आहे.