रस्ते प्रकल्प मार्गी लावणार

By admin | Published: June 27, 2014 02:17 AM2014-06-27T02:17:58+5:302014-06-27T02:17:58+5:30

येत्या 8 ते 10 दिवसांत मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा नौकावहन, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

Road projects will be planned | रस्ते प्रकल्प मार्गी लावणार

रस्ते प्रकल्प मार्गी लावणार

Next
>मुंबई : राज्यातील महामार्ग प्रकल्पांतील रखडलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना येत्या 8 ते 10 दिवसांत मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा नौकावहन, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 142 व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या सोहळ्य़ात ते बोलत होते.
राज्यातील 265 रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र त्यातील केवळ 4क् हजार कोटींच्या प्रकल्पांना पूर्णपणो मंजूरी मिळालेली आहे. तर जमीन हस्तांतरण आणि पर्यावरण खात्याच्या परवानग्यांअभावी सुमारे 35 हजार कोटींचे प्रकल्प रखडलेले आहेत. येत्या 8 ते 1क् दिवसांत त्यांनाही मंजूरी देण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले.
याबाबत आपण जातीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून या परवानग्या तात्काळ मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
समुद्रात फ्लोटिंग हॉटेल
मरिन ड्राईव्हच्या समुद्रात 5क्क् रुम्सचे फ्लोटिंग ह़ॉटेल उभारण्याची घोषणाही नितीन गडकरींनी केली. चार फ्लोटिंग रेस्टॉरंट आणि दोन फ्लोटिंग हेलिपॅडही उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे गडकरी यांनी सांगितले. गेट वे ऑफ इंडियासमोर समुद्रात होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेडिओ क्लबच्या बाजूला नवीन जेट्टी उभारण्यावर अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Road projects will be planned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.