कंत्राटदारांमार्फतच रस्ते दुरुस्ती, देखभाल

By Admin | Published: May 8, 2017 04:05 AM2017-05-08T04:05:36+5:302017-05-08T04:05:36+5:30

अपुरे मनुष्यबळ, नवीन भरतीवर असलेल्या निर्बंधांमुळे रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती कंत्राटदारांमार्फतच करण्याचा निर्णय

Road repair through caretakers, care | कंत्राटदारांमार्फतच रस्ते दुरुस्ती, देखभाल

कंत्राटदारांमार्फतच रस्ते दुरुस्ती, देखभाल

googlenewsNext

समीर देशपांडे/ लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अपुरे मनुष्यबळ, नवीन भरतीवर असलेल्या निर्बंधांमुळे रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती कंत्राटदारांमार्फतच करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. खड्डे ४८ तासांत भरले जातील.
‘वार्षिक देखभाल करार’या अंतर्गत ही कामे करून घेतली जाणार असून लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. खड्डे पडल्यानंतर मग बांधकाम विभागाची प्रक्रिया सुरू होणार.
मग ते खड्डे भरले जाणार. त्यामध्ये विलंब होऊ लागला. अशातच कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर नवीन भरतीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता ‘वार्षिक देखभाल करार’ संकल्पना पुढे आली आहे.

काय आहे संकल्पना?

जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची तालुकावर विभागणी करून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांचा निविदा काढण्यात येतील. दोन वर्षे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर राहील.

कामांची खातरजमा

खड्डे भरणे, बाजूपट्ट्यांची दुरुस्ती, गवत काढणे, झाडांच्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फांद्या काढणे, रस्त्यावर येणारे पाणी निर्गत करणे, पुलाचे तुटलेले रेलिंग बसवणे, सरकारी झाडे रंगवणे, वाहतुकीच्या नियमनासाठी आवश्यक असे फलक उभारणे ही सर्व कामे कंत्राटदाराला करावी लागतील.
कामांची खातरजमा करुन बिले अदा केली जातील.

Web Title: Road repair through caretakers, care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.