रस्त्याची झाली नदी!
By admin | Published: April 29, 2016 01:35 AM2016-04-29T01:35:19+5:302016-04-29T01:35:19+5:30
पुणे-सासवड रोडलगत ग्लायडिंग सेंटरमधून गोंधळेनगर, सातववाडीकडे जाणाऱ्या महापालिकेची पिण्याची पाइपलाइन सकाळी पाच वाजता फुटली.
हडपसर : एकीकडे पाण्याची बिकट परिस्थिती असताना पुणे-सासवड रोडलगत ग्लायडिंग सेंटरमधून गोंधळेनगर, सातववाडीकडे जाणाऱ्या महापालिकेची पिण्याची पाइपलाइन सकाळी पाच वाजता फुटली. त्यामुळे या भागाला नदीचे स्वरूप आले.
पाण्याचे लोंढे वाहत होते. हे पाणी पाहून सकाळी ग्लायडिंगमध्ये फिरायला जाणारे अवाक झाले. एकीकडे पाण्यासाठी लोक वणवण भटकत आहेत, तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. येथील चौरंग टेरेसच्या सदस्यांनी हा प्रकार पाहून नगरसेवक सुनील बनकर यांना संपर्क करून पाणी बंद करण्यास सांगितले.
पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अनेक ठिकाणी पाणीगळती होत आहे. प्रशासनाचा बेजबाबदारपणा यातून दिसून येत असून, पाणीटंचाईचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. (वार्ताहर)