रस्ते दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार

By admin | Published: June 9, 2016 02:24 AM2016-06-09T02:24:38+5:302016-06-09T02:24:38+5:30

आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्ते दुरूस्तीचे आणि खड्डे बुजवण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले

Road work should be completed before the monsoon | रस्ते दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार

रस्ते दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार

Next


मुंबई: आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्ते दुरूस्तीचे आणि खड्डे बुजवण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असा दावा मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात बुधवारी केला.
बुधवारच्या सुनावणीत महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी महापालिकेच्या हद्दीतील रस्ते दुरुस्तीचे व खड्डे बुजवण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पावसाआधी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन खंडपीठाला दिले. ‘रस्ते दुरुस्त करणे आणि खड्डे बुजवण्याचे काम पावसाळ्यातही सुरू असते. काम पूर्ण झाल्यानंतरही पावसाळ्यात रस्त्यांच्या देखभालीसाठी महापालिका पाहणी करणार आहे,’ असेही अ‍ॅड. साखरे यांनी सांगितले.
खड्डे पडल्याची व रस्ते खराब असल्याची तक्रार नागरिकांना करता यावी, यासाठी महापालिकेने हेल्पलाईन नंबर आणि मोबाईल अ‍ॅप सुरू केले असल्याचेही अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला सांगितले.
हेल्पलाईन नंबरची आणि मोबाईल अ‍ॅपला वर्तमानपत्रांद्वारे प्रसिद्ध द्यावी, अशी सूचना खंडपीठाने महापालिकेला केली. ‘जाहिराती ठळक आणि मोठ्या असू द्या. जेणेकरून लोकांना त्या सहजच दिसतील. जर राजकारण्यांच्या आणि महापालिकेच्या जाहिराती वर्तमानपत्राचे पूर्ण पान भरून येऊ शकतात तर या जाहिराती पूर्ण पान भरून का दिल्या जाऊ शकत नाही,’ अशी कोपरखळीही खंडपीठाने महापालिकेला मारली.
महापालिकेले आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावा, असे म्हणत खंडपीठाने पुढील सुनावणी १५ जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)
पत्राचे याचिकेत रूपांतर
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अपघातही वाढले आहेत, अशा आशयाचे पत्र उच्च न्यायालयाचे विद्यमान न्या. गौतम पटेल यांनी उच्च न्यायालयाला लिहीले होते. उच्च न्यायालयाने या पत्राचे जनहित याचिकेत रुपांतर केले.

Web Title: Road work should be completed before the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.