मोबदल्याशिवाय रस्त्याचे काम होऊ देणार नाही - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:59 AM2018-04-17T00:59:08+5:302018-04-17T00:59:08+5:30
नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकºयांचे पूर्ण समाधान होऊन त्यांची संमती मिळत नाही तोपर्यंत त्याच्या कामाला सुरुवात होऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे दिला.
कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकºयांचे पूर्ण समाधान होऊन त्यांची संमती मिळत नाही तोपर्यंत त्याच्या कामाला सुरुवात होऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात नागपूर-रत्नागिरी महामार्गासंदर्भातील शेतकºयांच्या अडचणींसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे, आवळी, आंबवडे, नावली तसेच हातकणंगले तालुक्यातील हेर्ले, नागाव, माले, चोकाक येथील शेतकºयांनी आपल्या अडचणी मांडून प्रश्न उपस्थित केले.
शेट्टी म्हणाले, या महामार्गासाठी पन्हाळा व हातकणंगले तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी संपादित होणार आहेत. नेमक्या किती जमिनी जाणार? तसेच भरपाई किती मिळणार याबाबतचा संभ्रम बैठकीनंतर दूर झाला आहे.
रस्त्यासाठी किती क्षेत्र लागणार असून, त्यासाठी लागणारे गट क्रमांक जाहीर करून ती यादी संबंधित गावांना दिल्यास सर्व गावांत असलेले घबराटीचे वातावरण कमी होईल.
१९ गावांची मोजणी पूर्ण
या मार्गावरील ४८ गावांपैकी १९ गावांची संयुक्त मोजणी झाली आहे. यामध्ये बोअरवेल, पाणीपुरवठा योजना, विहिरी यांची पाहणी करण्यात आली असून, त्याचे मूल्यांकन करण्यासाठी संबंधित विभागांकडे ते पाठविण्यात आले आहेत. उर्वरीत गावांचेही मोजणीचे काम सुरू आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.