मारहाण करून युवकास लुटले

By admin | Published: March 3, 2017 01:29 AM2017-03-03T01:29:10+5:302017-03-03T01:29:10+5:30

सीसी कॅमेऱ्यात घटना कैद : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Robbed Yuvakas by assault | मारहाण करून युवकास लुटले

मारहाण करून युवकास लुटले

Next

अकोला, दि.२ : बसस्थानकाजवळील रस्त्यावरून जाणाऱ्या युवकाला अडवून अनोळखी युवकाने त्याला मारहाण केली आणि त्याच्याकडील ४५0 रुपयांची रोख बळजबरीने हिसकावून घेतली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अनोळखी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी एका दुकानातील सीसी कॅमेऱ्याने टिपलेले चित्रण तपासले असता, अनोळखी युवक मारहाण करीत असल्याचे दिसून आले. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.
बाळापूर तालुक्यातील गोरेगाव बु. येथे राहणारा दीपक सुरेश आगरकर (२१) हा काही कामानिमित्त गुरुवारी दुपारी अकोल्यात आला होता. बसस्थानकावरून तो रुंगटा पेट्रोल पंप असलेल्या गल्लीतून जात असताना, सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास अनोळखी युवकाने त्याला अडविले आणि पैशाची मागणी केली.
दीपकने नकार दिल्यावर अनोळखी युवकाने त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील ४५0 रुपयांची रोख काढून घेतली. या दोघांमध्ये झालेली झटापट एका दुकानातील सीसी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.
दीपक आगरकर याने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन सीसी कॅमेऱ्यातील चित्रण तपासले. पोलिसांनी अनोळखी युवकाविरुद्ध भादंवि कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Robbed Yuvakas by assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.