ट्रक लुटणारी टोळी जेरबंद

By admin | Published: June 13, 2016 11:08 PM2016-06-13T23:08:51+5:302016-06-13T23:14:40+5:30

कर्जत : महामार्गावरील वाहने अडवून त्यांना लुटणारी टोळी कर्जत पोलिसांनी पाठलाग करून पकडली. चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.

The robbery gang raided the gang | ट्रक लुटणारी टोळी जेरबंद

ट्रक लुटणारी टोळी जेरबंद

Next

कर्जत : महामार्गावरील वाहने अडवून त्यांना लुटणारी टोळी कर्जत पोलिसांनी पाठलाग करून पकडली. चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. यामुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
नगर-सोलापूर महामार्गावर पाटेवाडी शिवारात रविवारी रात्री शिर्डीकडून बंगलोरकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक (के. ए. ३९, ५७९८) हा ट्रक टोळीने अडवला. पारेवाडी शिवारात इलेक्ट्रीक बोर्डाजवळ चढ व वळण आहे. तेथे वाहनांचा वेग कमी होतो याचा फायदा घेऊन आरोपींनी ट्रक अडवला. ते ट्रकमध्ये चढले. चालक व क्लिनरला चाकूचा धाक दाखवला, त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील रोख नऊ हजार रुपये काढून घेतले. घटना घडल्यानंतर ही माहिती कर्जतचे पोलीस निरीक्षक अजय चिंतले यांना समजली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महामार्ग गाठला. तेथे पेट्रोलिंग करत असताना हॉटेल सावनजवळ त्यांना संशयित आरोपी दिसले. पोलीस पाहताच त्यांनी पळ काढला. यानंतर पोलीस टीमने त्यांचा पाठलाग केला. चार आरोपींना पकडले. यामध्ये सचिन विठ्ठल आडागळे (वय ३०), रवींद्र आत्माराम गायकवाड (वय १९), तात्या दगडू कटारे (वय ३८), संतोष दत्तात्रय होले (वय ३९), सर्व लोणी मसदपूर, ता. कर्जत येथील रहिवाशी आहेत. या घटनेप्रकरणी ट्रकचालक अमर निजामोद्दीन शेख, रा. सांगवी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद याने कर्जत पोलिसात फिर्याद दिली. आरोपीची ओळख पटली. आरोपी पकडणाऱ्या पोलीस पथकात पोलीस निरीक्षक अजय चिंतले, पो. हेड. कॉ. ए. एच. जाधव, बी. बी. दिवटे, ए. एन. गर्जे, डी. जी. इनगवले, चालक बी. आर. पवार यांचा समावेश होता. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एन. ससाणे हे पुढील तपास करीत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The robbery gang raided the gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.