लुटणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

By Admin | Published: January 18, 2017 01:35 AM2017-01-18T01:35:01+5:302017-01-18T01:35:01+5:30

दोघा कर्मचाऱ्यांकडून २५ लाख रुपये लुटून भरधाव वेगाने मोटारसायकलवर पळ काढणाऱ्या दोघा आरोपींच्या दुचाकीला अपघात झाला

The robbery is in the police trap | लुटणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

लुटणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext


अवसरी : पोलीस असल्याची बतावणी करून लॉजी कॅश कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांकडून २५ लाख रुपये लुटून भरधाव वेगाने मोटारसायकलवर पळ काढणाऱ्या दोघा आरोपींच्या दुचाकीला अपघात झाला. रस्त्यावर दोघे लुटारू फेकले गेले. आणि लुटलेली कॅश रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली. त्या वेळी तेथून जाणाऱ्या वाहनचालकांना चोरीचा संशय आल्याने दोघांना कॅशसह पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
ही घटना मंचर-पारगाव रस्त्यावर अवसरी बुद्रुक गावाच्या हद्दीतील हिंगेवस्ती येथे भरदिवसा घडली. केवळ पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आरोपी मुद्देमालासह एका तासात पकडण्यात पोलिसांना यश आले. या घटनेत आरोपी अजय जर्नादन गायकवाड (वय ३२ राहणार धानोरी शिवणगाव जि.नांदेड) आणि प्रकाश लक्ष्मण पवार (राहणार रांझणी देवाची, ता. माढा, जि.सोलापूर) यांना मंचर पोलिसांनी अटक केली.
लॉजी कॅश कंपनी विमाननगर पुणे येथे एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करते. त्यानुसार लॉजी कॅश कंपनीचे कर्मचारी विजय शिवाजी ढेरे (राहणार खवासपूर ता.सांगोला, जि. सोलापूर) आणि सुशांत दत्ता वाघ (राहणार वाघोबा बुळ ता.केज, जि.बीड सध्या मंचर येथे राहात आहे) हे दोघे अांबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतील बँकांतील एटीएमसाठी कॅश पुरवण्याचे काम करतात. त्यानुसार या दोघांनी राजगुरुनगर येथील स्टेट बँकेतून २५ लाख रुपयांची रोकड एका बॅगेत भरून एमएच ४४ पी ४७५६ या दुचाकीवरून ते मंचर येथे आले. मंचर-बेल्हा रस्त्यावरील रांजणी आणि निमगाव सावा या दोन गावांच्या हद्दीवर असणाऱ्या जंगलात पोलिसासारखा गणवेश घातलेल्या एकाने त्यांना हात केला. त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या साथीदाराने रस्त्यावर आडवे उभे राहून सुशांत वाघ चालवित असलेल्या मोटारसायकलला थांबण्यास भाग पाडले. पोलीस असल्याचे सांगून खिशातील कागदपत्रे आणि मोबाईल व रोख रक्कम काढून घेतले. तिथून या दोघांनी पोबारा केला. मंचर पोलीस ठाणे अंमलदार एस. वाय. मुजावर यांना २५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लुटल्याचे सांगितले. तातडीने घडलेली घटना मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना ठाणे अंमलदारांनी सांगितली. पोलिस निरीक्षक गोडसे यांनी तातडीने कार्यवाही केली. चार पोलीस पथके मंचर पारगाव रस्ता, मंचर रांजणी रस्ता, मंचर पिंपळगाव रस्ता या भागात तैनात केली.
पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. दरम्यान समोरून उसाचे वाढे घेऊन येणारे रवींद्र विठोबा टाव्हरे आणि वैभव रवींद्र टाव्हरे या बापलेकांच्या मोटारसायकलला आरोपींच्या मोटारसायकलने धडक दिली. धडक एवढी जोरात होती, की आरोपींची मोटारसायकल रस्त्यावर पडली. दोन्ही आरोपी गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले. (वार्ताहर)

Web Title: The robbery is in the police trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.