तडवळ स्टेशनवर रेल्वेवर दरोडा

By admin | Published: May 29, 2016 09:06 PM2016-05-29T21:06:55+5:302016-05-29T21:06:55+5:30

तडवळ रेल्वेस्टेशन वर थांबलेल्या हुबळी- सिंकदराबाद एक्सप्रेसवर रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दरोडा पडला

The robbery on the railway station | तडवळ स्टेशनवर रेल्वेवर दरोडा

तडवळ स्टेशनवर रेल्वेवर दरोडा

Next

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 29-  तडवळ रेल्वेस्टेशन वर थांबलेल्या हुबळी- सिंकदराबाद एक्सप्रेसवर रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दरोडा पडला.या दरोड्यात चोरट्यांनी प्रवाशांना मारहाण करुन ९ तोळे दागिने लुटले.घटने दरम्यान आरपी एफ पोलीसांची अनुउपस्थिती दिसल्याने प्रवाशांनी चारतास रेल्वे अडवून धरुन राग व्यक्त केला.
याबाबत सुनिल सतिश तिवारी (वय ४५,रा. सिंगापूर, हैद्रराबाद) यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दुपारी फिर्याद नोंदवली. तिवारे हे २८ मे रोजी सिंकदराबादला जाण्यासाठी हुबळी स्थानकावरुन निघाले. दरम्यान रेल्वे रविवारी पहाटे चार वाजता तडवळ रेल्वेस्टेशनवर पंधरा मिनिट थांबली. दरम्यान बोगी क्रमांक एस १,४,५,६ या डब्यातून महिला आणि पुरुषांचा आरडा ओरडीचा आवाज आला. त्यांनी बाहेर डोकावले असता काही चोरटे दागिने लुटून निघाल्याचे दिसले. अंगात काळया निळया रंगाचे शर्ट हाफ पॅन्ट परिधान केले दरोडेखोर तिथून पळत जाताना दिसले.
तिवारी यांनी इतर डब्यामध्ये फिरुन पाहणी केली असता, तिखिट तपासणीस व आरपीएफ जवान दिसून आले नाहीत. आरपीएफ जवानांनी दाखविलेल्या हलगरजी पणाचा राग होडगी स्टेशनवर रेल्वे थांबवून प्रवाशांनी व्यक्त केला. तणावाच्या वातावरणात अधिकाऱ्यांनी गाडी पुढे नेली. याचा तपास लोहमार्गचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद सातव हे करत आहेत.
...................
अधीक्षक तडवळयात ठाण मांडून
प्रवाशांनी होडगी रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोकून धरल्याची समजातातच, अधिक्षक विश्व पानसरे हे सोलापूरात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी जावून विभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणची माहिती घेण्यास सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नव्हते.
..................
ग्रामीणकडून श्वान पथक देण्यास नकार
सदर घटनेनंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी ग्रामीण पोलिसांकडे एका पत्राव्दारे श्वान पथकाची मागणी केली. मात्र सामाजिक न्याय मध्ये बडवले हे सोलापूरात आले असून त्यांच्या बंदोस्तासाठी हे श्वान पथक देण्यात आल्याचे सांगून टाळाटाळ केली. त्यामुळे लोहमार्ग पोलीसांनी आरपीएफ पोलिसांच्या श्वान पथकावर अवलंबून राहवे लागले. त्यांचा काही फायदा झाला नाही.

Web Title: The robbery on the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.