मालेगावात एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

By admin | Published: August 12, 2016 07:37 PM2016-08-12T19:37:13+5:302016-08-13T00:46:08+5:30

एकदा दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून गुरूवारच्या रात्रीदरम्यान मालेगाव शहरातील तीन ठिकाणी दरोडा टाकून रोकडसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.

Robbery at three places in Malegaon one night | मालेगावात एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

मालेगावात एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

Next

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 12-  मंगळवारच्या रात्री टाकलेल्या दरोडा घटनेची शाई वाळत नाही; तोच पुन्हा एकदा दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून गुरूवारच्या रात्रीदरम्यान मालेगाव शहरातील तीन ठिकाणी दरोडा टाकून रोकडसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.
नागरदास रोडवरील साईनगरातील प्रदीप भवनसिंग जोहरे व शे. असीफ शे. ईसुफ यांच्या घरी तसेच संदीप सोळंके यांच्या दुकानात दरोडेखोरांनी धूमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मालेगाव नागरदास मार्गावर असलेल्या साईनगरमधे राहत असलेले जोहरे यांच्या घरी गुरुवारच्या रात्री १२ ते १२:३० वाजतादरम्यान खिडकीचे काच फोडण्याचा आवाज आला. खिडकीतुन बाहेर पाहिले असता, बाहेर ५ ते ७ जण दिसून आले. जोहरे यांनी शेजारी असलेल्या श्रीराम सिताराम भुजाडे यांना फोन करुन बोलाविले. दरम्यान भुजाडे आल्याचे समजून जोहरे यांनी घराचा दरवाजा उघडताच, दबा धरुन बसलेल्या दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. जोहरे यांच्या गळ्याला कोयता लावून व घरातील लोकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून घरातील रोख अडीच लाख रुपये व ३२ तोळे सोन्या-चांदीचे दागीने व घरातील नविन साड्या असा ऐवज लंपास केला.एवढ्यात शेजारी असलेले भुजाडे तेथे आले असता त्यांनादेखील लोखंडी पाईपने मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर गांधीनगरातील शे. असीफ शे. ईसुफ यांच्या घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. महिलांच्या गळ्यातील पोथ व कानातले दागीने हिसकावून घेतले. तिसरी घटना नागरतास रोडवरील जगदंबा वेल्डिंग वर्क येथे घडली. येथील संदीप सोळंके यांना मारहाण करून रोख रक्कम लंपास केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तोपर्यंत दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनास्थळी प्रभारी पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे व ठाणेदाराने घटनेची माहिती जाणून घेतली. १२ आॅगस्ट रोजी घटनास्थळी बोटाचे ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचरण करण्यात आले होते. मात्र, कोणताही सुगावा लागला नसल्याची माहिती आहे. घटनास्थळी एक चाकू आढळून आला. प्रदीप भवनसिग जोहरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोराविरूद्ध भादंवी कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Robbery at three places in Malegaon one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.