रोबो काढणार आता बागेतील फळे
By admin | Published: April 12, 2017 04:19 AM2017-04-12T04:19:37+5:302017-04-12T04:19:37+5:30
ऊसतोडणी, फळेकाढणीसारख्या शेतकामांसाठी अनेकदा मनुष्यबळाचा तुटवडा असतो. मात्र लवकरच ‘टाटा’चा ‘ब्राबो’ रोबो ही कमतरता भरून काढणार आहे. बाजारात दाखल होताच
मुंबई : ऊसतोडणी, फळेकाढणीसारख्या शेतकामांसाठी अनेकदा मनुष्यबळाचा तुटवडा असतो. मात्र लवकरच ‘टाटा’चा ‘ब्राबो’ रोबो ही कमतरता भरून काढणार आहे. बाजारात दाखल होताच ‘ब्राबो’ला चेरी काढणीच्या कामासाठी यूकेमधील एका शेतकऱ्याकडून मागणी आली आहे. त्यादृष्टीने आता प्रयोग केला जात असून, तो यशस्वी होताच भारतातही ‘ब्राबो’ला शेतकामात जुंपता येईल, अशी माहिती ‘टाल’ मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशनचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमित भिंगुर्डे यांनी ‘लोकमत’ला दिली.
टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या ‘टाल’ने तयार केलेल्या पूर्णत: भारतीय बनावटीच्या ‘ब्राबो’ या रोबोचे मंगळवारी मुंबईत अनावरण करण्यात आले. या वेळी ‘टाल’चे अकार्यकारी संचालक आणि अध्यक्ष आर. एस. ठाकूर, ‘टाल’चे विक्री विभागाचे महाव्यवस्थापक संदीप दावखर यांची उपस्थिती होती. मोठ्या व मध्यम उद्योगांमध्ये रोबोटिक तंत्राचा वापर आधीपासूनच सुरू आहे. मात्र महागडे विदेशी रोबो लघू व सूक्ष्म उद्योगांच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’च्या हाकेला प्रतिसाद देत टाटा समूहाने गेल्या तीन वर्षांच्या प्रयत्नांतून किफायतशीर भारतीय रोबोट तयार केला आहे. ५ ते ७ लाखांच्या किमतीत उपलब्ध होणाऱ्या या रोबोचा देखभाल खर्चही कमी आहे. महिंद्रा आणि महिंद्रा, सीपीजी इंडस्ट्रीजसारख्या उद्योग समूहांनी या रोबोचा वापर करून त्याला पसंती दिली आहे. २ आणि १० किलो अशा दोन प्रकारचे ‘ब्राबो’ बाजारात आणण्यात आले आहेत. यामुळे उत्पादक क्षमता १५ ते ३० टक्क्यांनी वाढविता येईल. (प्रतिनिधी)
- 25
रोबोंची विक्री झाली आहे, तर ३० रोबो अन्य लघुउद्योजकांना प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यासाठी देण्यात आले आहेत.