औरंगाबादेत ‘रॉक आॅन’चे तुफान !
By Admin | Published: November 4, 2016 05:50 AM2016-11-04T05:50:29+5:302016-11-04T05:50:29+5:30
रॉक आॅन-है ये वक्त का इशारा, रॉक आॅन हर लम्हा पुकारा, जिंदगी ना मिलेगी दोबारा’ असे रॉक गीत फरहान अख्तर, श्रद्धा कपूर यांनी गात औरंगाबादकरांचे ‘दिल’ जिंकले
औरंगाबाद- रॉक आॅन-है ये वक्त का इशारा, रॉक आॅन हर लम्हा पुकारा, जिंदगी ना मिलेगी दोबारा’ असे रॉक गीत फरहान अख्तर, श्रद्धा कपूर यांनी गात औरंगाबादकरांचे ‘दिल’ जिंकले... जोशपूर्ण स्वर, बेधुंद संगीताने सळसळत्या तरुणाईला सायंकाळी तुफान आले होते... सारे जण देहभान विसरून थिरकत होते... अख्खी तरुणाई ‘रॉक’मय झाली होती... ‘रॉक आॅन’ लाईव्ह कॉन्सर्टचा जोश, जल्लोष, मस्ती, धमाल काय असते... याची अनुभूती औरंगाबादकरांनी पहिल्यांदाच अनुभवली. ‘टाटा टी गोल्ड’ प्रस्तुत लोकमत रॉक आॅन २-लाईव्ह इन कॉन्सर्टने बुधवारची सायंकाळ ‘रॉक’ मय करून टाकली होती... बीड बायपास रोडवरील जबिंदा इस्टेटवर औरंगाबादेतील अख्खी तरुणाई अवतरली होती...
>चाहत्यांना
सेल्फी...
अरायव्हलमधून रॉक आॅनचा चमू बाहेर येताच चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड उडाली. विमानतळ सुरक्षा अधिकारी, कर्मचारी, संचालक येवले यांच्या टीमने सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. फरहान, श्रद्धा, अर्जुन, पुरब यांनी सर्व चाहत्यांना सेल्फी घेऊ दिले.
>स्लो मोशन अंग्रेजा... क्यूं की तुम ही हो...
‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातील ‘स्लो मोशन अंग्रेजा’ या गीताची कॉलर ट्यून काही युवकांच्या मोबाईलवर होती. सेल्फी काढताना काहींनी ती फरहानचे लक्ष वेधण्यासाठी मुद्दामहून वाजविली. तर श्रद्धाच्या चाहत्यांनी आशिकी-२ मधील क्यूं की तुम ही हो...जिंदगी या कॉलर ट्यूनचा आवाज चढविला.
>कलाकारांनीही केले शेअर फोटो
रॉकप्रेमींचा एवढा प्रचंड जनसमुदाय पाहून फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल आणि पुरब कोहली तर भारावूनच गेले. आतापर्यंतचा हा आमचा सर्वात मोठा रॉक शो होता, अशी त्यांची प्रतिक्रियाच सर्व काही सांगून जाते. सर्व कलाकारांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या कॉन्सर्टबद्दल पोस्ट केले. फरहानने कॉन्सर्टच्या बातमीचा फोटो ट्विट करून लिहिले की, जेव्हा साठ हजार लोक तुमचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी येतात, तेव्हा कार्यक्रम काही स्पेशल असतो. औरंगाबादकरांना तुमचे खूप खूप आभार. मी तर तुमच्या प्रेमात पडलो. तसेच त्याने दुसऱ्या ट्विटमध्ये ‘लोकमत’चे सहव्यवस्थापकीय तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि कार्यकारी संचालक करण दर्डा यांचे एवढा भव्यदिव्य कॉन्सर्ट आयोजित केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
>पंजाबी ठेक्यावर सारेच थिरकले
रॉक संगीतामध्ये चक्क पंजाबी ठेका धरत ‘हवन कुंड में हवन करेंगे, हवन करेंगे’ हे गीत तेवढ्याच धडाक्यात,जल्लोषात गात फरहान अख्तरने साऱ्यांना थिरकण्यास भाग पाडले... तरुणाईने ‘हवन करेंगे, हवन करेंगे’ असा कोरस देत पंजाबी ढंगातील गाण्याला चार चांद लावले.
>75 हजार नागरिकांची उपस्थिती
रॉक आॅन कॉन्सर्टला शहरातील तरुण- तरुणी आणि नागरिक अशी सुमारे ७५ हजारांची गर्दी होती. २० आॅक्टोबर रोजी हा कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले आणि अवघ्या बारा दिवसांत औरंगाबादमध्ये भव्य दिव्य कार्यक्रमाचा इतिहास घडला. ‘लोकमत’चे कार्यक्रम म्हणजे भव्य दिव्य असाच अनुभव असतो. तोच अनुभव ‘रॉक आॅन २’ शोने बुधवारी नागरिकांना दिला.
>‘औरत एक इन्सान है, जो औरत का एक सच्चा साथी है, दोस्त है वही मर्द है’ अशा धीरगंभीर आवाजात डॉयलॉग म्हणत फरहान अख्तरने लोकप्रिय ठरलेले ‘जागो’ हे गीत गात महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. तरुणाईला वेड लावणाऱ्या या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता सामूहिकरीत्या राष्ट्रगीत म्हणत झाली... या लोकमत रॉक आॅन-२ लाईव्ह इन कॉन्सर्टचे पॉवर्ड बाय ‘एम. के. कन्स्ट्रक्शन’ व ‘ई-राईडस्’ हे होते.
>रात्री ८.१० मिनिटांनी अर्जुन रामपाल व पुरब कोहलीने ‘औरंगाबाद जिंदाबाद’ अशी जोरात साद घालत रंगमंचावर एन्ट्री केली. समोर ७५ हजार चाहते पाहून दोघेही भारावून गेले होते. आम्ही देश-विदेशात ६० पेक्षा अधिक लाईव्ह कॉन्सर्ट केले; पण एकाच ठिकाणी एवढे चाहते पहिल्यांदाच पाहिले, असे म्हणत औरंगाबादकरांचा त्यांनी गौरव केला.
>सिल्व्हर अॅण्ड सिंपल : श्रद्धाने अतिशय सिंपल लुकमधील व्हाईट सिल्व्हर मेडी घातलेली होती. तर फरहानने ब्ल्यू अॅण्ड ग्रे रंगाचा ट्रॅक सूट घातलेला होता. त्याच्या कानाला सॉफ्ट हेड फोन होता. त्याआधारेच त्याने रॉक आॅन लाईव्ह कन्सर्टची रिहर्लसल प्रवासात पूर्ण केली असावी.
>फरहान अख्तर, श्रद्धा
एकाच मर्सिडीझमध्ये
जबिंदा मैदानावर सायंकाळी ७
वाजून १२ मिनिटांनी कलावंतांचे आगमन झाले. फरहान आणि श्रद्धा हे चंदेरी, करड्या रंगाच्या एकाच मर्सिडीझमधून आले. त्यानंतर
काही क्षणातच लाल रंगाच्या मर्सिडीझमधून रामपाल आणि पुरब दाखल झाले. मैदानावर आगमन होताच कलावंतांनी आपापल्या ‘ग्रीन रूम’ मध्ये प्रवेश केला.
शिट्या व टाळ्यांच्या साथीने त्यांनी ‘एक लडकी का फोन नंबर... ना ना ना नार ना’
हे गीत सादर केले... अख्खी तरुणाई ‘श्रद्धा... श्रद्धा... श्रद्धा’ घोष करीत असतानाच काळ्या रंगाचा क्रॉप टॉप व लाँग शूज परिधान केलेली श्रद्धा ८.४१ वाजता मंचावर आली. तिने ‘उड जा रे पंछी’ हे पहिले गीत गाऊन उत्साह शिगेला नेऊन
>रॉक बँडच्या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या वीज, ध्वनी यंत्रणेचा ‘रॉक आॅन लाईव्ह कॉन्सर्ट’निमित्त औरंगाबादेत प्रथमच वापर करण्यात आला. फरहान, श्रद्धा कपूर, रामपाल, पुरब कोहलीच्या सादरीकरणास तितक्याच तोलामोलाची साथ अत्याधुनिक वीज, ध्वनी यंत्रणेमुळे मिळाली.
>फरहानने ‘सिंबाद द सेलर’ हे ‘रॉक आॅन’ चित्रपटातील गीत गाऊन पहिल्याच गाण्यावर तरुणाईला थिरकायला लावले... यानंतर ‘दिल धडकने दो’ , ‘ मै एैसा क्यू हंू’ हे गीत सादर करून रॉकच्या मोहिनीमंत्रात साऱ्यांना झिंगविले... औरंगाबाद वेरूळ-अजिंठा लेण्यांमुळे जगविख्यात आहे.