रायगडमधील रोहा आणि रत्नागिरीमधील दापोली परिसराला अतिवृष्टीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 09:44 PM2017-09-10T21:44:15+5:302017-09-10T21:44:24+5:30
जिल्ह्यातील रोहा आणि रत्नागीरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांच्या परिसरावर १५ किमी अंतराचा तीव्र जलढग निर्माण झाला असल्याने विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे.
जयंत धुळप
रायगड, दि. 10 - जिल्ह्यातील रोहा आणि रत्नागीरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांच्या परिसरावर १५ किमी अंतराचा तीव्र जलढग निर्माण झाला असल्याने विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
दरम्यान मुरुड तालुक्यात रविवारी सायंकाळी ७वाजल्यापासुन वीजेच्या कडकडासह जोरदार वारे वाहु लागले .अचानक वारा व वीजेच्या लखलखाटासह पावसास प्रारंभ झाला आहे. समुद्रकिनारी असणारे पर्यटक व स्थानिक नागरिक यांची मोठी धावपळ उडाली.
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची आत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास रायगड जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या ०२१४१-२२२११८, २२२०९७, २२२३२२ वा ९७६३६४६३२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी केले आहे.