रोहित देव प्रभारी महाधिवक्ता

By admin | Published: March 24, 2016 02:16 AM2016-03-24T02:16:21+5:302016-03-24T02:16:21+5:30

अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या महाधिवक्तापदाची तात्पुरती जबाबदारी सहयोगी महाधिवक्ता अ‍ॅड. रोहित देव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे

Rohit Dev In-charge Advocate General | रोहित देव प्रभारी महाधिवक्ता

रोहित देव प्रभारी महाधिवक्ता

Next

नागपूर : अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या महाधिवक्तापदाची तात्पुरती जबाबदारी सहयोगी महाधिवक्ता अ‍ॅड. रोहित देव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अ‍ॅड. देव हे केंद्र शासनाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरलही आहेत. आतापर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य शासनातर्फे कामकाज सांभाळीत होते. ते नागपूरकर असून त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून १९८६ मध्ये एल.एल.बी. पदवी प्राप्त केली आहे. यानंतर त्यांनी वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे कार्य केले. १९९० पासून त्यांनी स्वतंत्रपणे वकिली व्यवसायाला सुरुवात केली.

Web Title: Rohit Dev In-charge Advocate General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.