गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 03:36 PM2020-01-23T15:36:33+5:302020-01-23T16:04:00+5:30

'गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालाच पाहिजे'

rohit pawar aditya thackeray trying get world heritage forts maharashtra | गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा पुढाकार

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा पुढाकार

googlenewsNext

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार अनेक पाऊले उचलली जात आहेत. यातच गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला असून यासंदर्भात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा (वर्ल्ड हेरिटेज) दर्जा कसा मिळेल, यासाठीही प्रयत्न करावे लागणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. यासंदर्भात रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. 

रोहित पवार यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, "आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हा आपल्यासाठी ऐतिहासिक ठेवा असून खऱ्या अर्थाने महाराजांच्या पराक्रमाची स्मारके आहेत. त्यांची जपणूक आणि संवर्धन करण्याची फार मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवरच आहे. तसंच या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा (वर्ल्ड हेरिटेज) दर्जा कसा मिळेल यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहे. त्यासाठी पर्यटनमंत्री आदित्यजी ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याकडे विनंती केली. त्यांनीही माझ्या मागणीला पूर्ण सहमती दर्शवली आणि याबाबत अभ्यास सुरु असून महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालाच पाहिजे, असे स्पष्ट मत मांडलं. तसंच एका स्वतंत्र कार्यक्रमाची आखणी केली जाईल आणि या माध्यमातून गड-किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं."

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठा निर्णय घेतला होता. या पहिल्या बैठकीत किल्ले रायगडसाठी 20 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी जवळपास 606 कोटींचा खर्च आहे. यासाठी 20 कोटी खर्च झाले आहेत. 

(आदित्य ठाकरेच्या 'त्या' निर्णयाचे अजिंक्य रहाणेकडून कौतुक...)

महत्त्वाच्या बातम्या

मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण

मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग

मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मराठा संघटनांनी केली 'ही' मागणी

MNS Maha Adhiveshan Live : ‘जेंडर बजेट’ म्हणजे स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्पाबाबत शालिनी ठाकरेंनी मांडला ठराव

मनसे महाअधिवेशन : ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"

Web Title: rohit pawar aditya thackeray trying get world heritage forts maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.