वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांकडे मागितलं खास गिफ्ट, म्हणाले...
By बाळकृष्ण परब | Published: September 28, 2020 04:59 PM2020-09-28T16:59:07+5:302020-09-28T17:03:37+5:30
आमदार रोहित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करून एक खास गिफ्ट मागितले आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करून एक खास गिफ्ट मागितले आहे. सध्या आलेल्या कोरोनाच्या संकटकाळात केक, बॅनर बुकेवर खर्च करण्यापेक्षा साधेपणाणे सामाजिक भान जपून वाढदिवस साजरा करावा. तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावा, नैराश्य आलेल्या तरुणांना आधार द्यावा. तसेच कोरोनाकाळात आघाडीवर राहून लढणाऱ्याना आपल्या भागातील व्यक्तींना एखादं फूल देवून प्रोत्साहन द्यावे, हेच माझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट असेल, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.
फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून रोहित पवार यांनी वाढदिवसानिमित्तची आपल्या मनातील भावना कार्यकर्त्यांसमोर मांडली आहे. ते म्हणाले की, ''माझा वाढदिवस उद्या असला तरी राज्यातील माझे मित्र, बंधु-भगिनी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा करायला सुरुवात केली आहे. आपल्या या आपुलकीच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करत असताना आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल. पण वाढदिवसानिमित्त मला आपल्या सर्वांकडून एक गिफ्ट हवंय. मी ते तुम्हाला हक्काने मागतोय आणि आपण ते मला नक्की द्याल असा मला विश्वास आहे.''
रोहित पवार कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हणाले की, कोरोनामुळे सध्या शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. पण अनेकांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. अशा विद्यांना मदत करण्याबाबत, स्मार्टफोनसारखी साधने घेऊन देण्याबाबत, दहावी, बारावी झालेल्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत विचार करावा. नैराश्याने ग्रासलेल्या तरुणांना धीर देण्याचा विचार करा. आता हे आवाहन मी इतरांना करतोय असं नाही. मी स्वत: शारदानगर संकुलातील १०० मुलींच्या शिक्षणाचा यंदाचा खर्च उचलण्याचा संकल्प माझ्या वाढदिवसानिमित्त केला आहे.
तसेच कोरोनाकाळात आपल्या गावात, परिसरात आघाडीवर राहून काम करणाऱ्या व्यक्तींचा एखादे फूल देऊन सन्मान करा. कोरोनाबाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करा, यंदाच्या वाढदिवशी हेच माझ्यासाठी बर्थ डे गिफ्ट असेल, असे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच येणारा काळ हा संधीचा आणि सोबतच अडचणींचा असेल, त्यामधून आपल्या मार्ग काढावा लागेल, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...
आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी