रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 09:13 AM2020-03-02T09:13:15+5:302020-03-02T09:20:27+5:30

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली असून त्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे.

Rohit Pawar defends Aditya Thackeray; gave the answer to Ashish Shelar and Chandrakant Patil pnm | रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर

रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देआशिष शेलारांनी मिशन मुंबई या राष्ट्रवादीच्या मोहिमेवर केली टीका तुमच्या अहंकारामुळेच भाजपाला बुरे दिन आले, रोहित पवारांचा टोला आदित्य ठाकरेंवर टीका करण्यापूर्वी त्यांनी केलेलं काम बघा - रोहित पवार

मुंबई - महाविकास आघाडीवर टीका करण्याची भाजपा नेते एकही संधी सोडत नाही. मात्र त्याला प्रत्युत्तर म्हणून रोहित पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधी पक्षाला टोला लगावला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला कोंडी करण्याचा भाजपा प्रयत्न करते. आदित्य ठाकरेंना मंत्रिपद देण्यावरुन भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला होता. 

यावेळी भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, कुठलाही अनुभव नसताना उद्धव ठाकरेंनी मुलगा आदित्यला कॅबिनेट मंत्री केलं आहे. आता वहिनींना सामनाचं संपादक केलं आहे. त्या खूप चांगलं सांभाळतील असा चिमटा त्यांनी काढला होता. तर त्यावर राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर देत अनुभवापेक्षा आदित्य ठाकरेंनी केलेले काम बघा, एकमेकाची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू शकता असं सांगितले. 

तसेच तुमच्या सत्ताकाळात मंत्रिपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे तर तुम्ही अनुभवावर बोलत नाहीत ना? असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर लक्ष्य केल्याचा चिमटा रोहित पवारांनी काढला आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली असून त्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे. त्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६० तर दुसरे म्हणतात ५० जिंकू, आहेत त्या ८ जागा टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येतं? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर, विनोदीच आहे सगळं, पालिकेत अबकी बार भाजपा सरकार अशा शब्दात एकाचवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टार्गेट केले आहे. 

त्यावरुन रोहित पवार म्हणाले की, भाजपाचे सुरुवातीला दोनच खासदार होते. आज केंद्रात तुमच्या पक्षासाठी आलेले अच्छे दिन हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातील तुमच्या पक्षासाठी आलेले बुरे दिन हे अशाच अहंकाराचं फळ आहे. असं सांगत आता तरी सुधरा राव असा टोला हाणला आहे.  
 

Web Title: Rohit Pawar defends Aditya Thackeray; gave the answer to Ashish Shelar and Chandrakant Patil pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.