Maharashtra Political Crisis: “मध्यावधी निवडणुका झाल्याच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 02:17 PM2022-07-07T14:17:59+5:302022-07-07T14:18:12+5:30

Maharashtra Political Crisis: निवडणुका लागल्यास मताधिक्य आणि आमदारांचा आकडा वाढेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

rohit pawar said if now elections held the number of mla of ncp will be highest | Maharashtra Political Crisis: “मध्यावधी निवडणुका झाल्याच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील”

Maharashtra Political Crisis: “मध्यावधी निवडणुका झाल्याच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील”

googlenewsNext

अहमदनगर: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनेही मध्यावती निवडणुका लागतील, असा दावा केला आहे. यानंतर आता मध्यावती निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केला आहे. 

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागू शकतील, असा दावा केला होता. त्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही पवारांचीच री ओढत हे सरकार तात्पुरते असल्याचे म्हटले होते. तसेच आता निवडणुका लागल्यास शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून येतील, असा दावाही केला होता. यानंतर आता रोहित पवार यांनी आता निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या कर्जत दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते माध्यामांशी बोलत होते. 

निवडणुका लागल्या तर लढावे लागेलच

निवडणुका लागल्या तर लढावे लागतीलच. मात्र, निवडणुका लागू नये, त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. तसेच एखाद्या विषय चिघळल्यानंतर तो कोर्टात गेला तर निवडणुका घ्याव्याच लागतील, त्यावेळी सर्वांत जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील. गेल्या निवडणुकात काही फरकाने पराभूत झालेले आमदार निवडून येतील, तसेच आमच्या आमदारांचे मताधिक्यही वाढलेले दिसेल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी यावेळी आमदार राम शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. राम शिंदे यांच्या आमदारकीमुळे तालुक्याला फायदा होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र ज्या पद्धतीने ते दहा वर्षांमध्ये वागले, त्याप्रमाणे तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. राम शिंदे यांना मंत्रीपद असताना अनेक गोष्टी प्रलंबित राहिल्या. आता विकास कामे होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असतील तर ते योग्य नाही. तसेच माझ्या दोन्ही तालुक्यात अन्याय झाला तर ते मी खपून घेणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी यावेळी दिला.

दरम्यन, निधी वाटपावरून केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य नाही. असे आरोप होत असतात. अजित पवार यांनी विधिमंडळात निधीवाटपाची आकडेवारीच दिली आहे. काही आमदार, मंत्री नाराज असल्याचे दाखवत असले, तरी त्यांना चांगला निधी गेल्याचे दिसत आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले. 
 

Read in English

Web Title: rohit pawar said if now elections held the number of mla of ncp will be highest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.