छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 08:11 PM2023-09-05T20:11:57+5:302023-09-05T20:12:35+5:30

'अजूनही वेळ गेलेली नाही, अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार परत येऊ शकतात.'

rohit pawar slams ajit pawar and bjp, Small engines should dare to speak to big engines in Delhi about reservation - Rohit Pawar | छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार

छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार

googlenewsNext

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यापासून शरद पवार गटाचे नेते आणि अजित पवार गटाचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. यातच आता आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. जळगावमध्ये बोलताना रोहित पवारांनी मराठा आरक्षणावरही आपली प्रतिक्रिया दिली.    

अजून वेळ गेली नाही...
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार गट शरद पवार यांचा फोटो वापरतात, कारण त्यांना माहित आहे की, साहेबांशिवाय लोक आपल्याला मतदान करणार नाहीत. ज्यांना मंत्रिपदे मिळाली, सत्तेत गेले, ते कदाचित साहेबांना विसरले असतील, पण अनेक आमदार हे साहेबांना विसरलेले नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाही, अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार परत येऊ शकतात, असं रोहित पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, चिन्ह असले काय आणि नसले काय, पवार साहेबांच्या हिंमतीवर, लोकांच्या ताकदीवर, लोकांना विश्वासात घेऊन, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांचा अंहकार संपविल्या शिवाय राहणार नाही. भाजपच्या सत्तेत जाणाऱ्या नेत्यांनी स्वार्थासाठी आपली भूमिका बदलली, यावरून लोकांनी विचार करावा की, कोणावर विश्वास ठेवायचा.

...तर आम्ही त्यांना मानू
कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी न करता, सरकारने मराठा आणि धनगर समजाला आरक्षण देण्याची हिंमत दाखवावी. तीन छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल त्यांच्या दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी. केंद्राच्या अधिवेशनात धनगर समाजाचा तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुद्दा जर हे त्रिकूट सरकार मांडू शकत असेल तर आम्ही त्यांना मानू, असंही ते म्हणाले

Web Title: rohit pawar slams ajit pawar and bjp, Small engines should dare to speak to big engines in Delhi about reservation - Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.