रोहित पवारांच्या मिरवणुकीत चार टन गुलालाची उधळण; ३० जेसीबी, ५ पोकलेन, क्रेनचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 01:51 AM2019-11-02T01:51:52+5:302019-11-02T01:52:08+5:30
पवार हे आमदार झाल्यानंतर प्रथमच जामखेड शहरात आले होते.
जामखेड (जि़ अहमदनगर) : राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांच्या जामखेड शहरात शुक्रवारी काढलेल्या विजयी मिरवणुकीत चार टन गुलालाची उधळण करण्यात आली. हा गुलाल उधळण्यासाठी ३० जेसीबी, पाच पोकलेन, क्रेनचा वापर करण्यात आला. शहरातील रस्त्यांवर गुलालाच खच पडला होता.शहरात अशी मिरवणूक प्रथमच निघाली होती.
पवार हे आमदार झाल्यानंतर प्रथमच जामखेड शहरात आले होते. कार्यकर्त्यांनी ते येण्याअगोदरच मिरवणुकीची जय्यत तयारी केली होती. मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळण्यासाठी ३० जेसीबी, पाच पोकलेन, क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी जेबीसी उभे करण्यात आले होते. रोहित पवारांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सकाळी अकराच्या सुमारास मिरवणुकीत सुरुवात झाली. त्यानंतर जेसीबीच्या बकेटमधून मिरवणुकीवर गुलालालची उधळण केली जात होती. दोन किलोमीटर अंतर कापून जाण्यास पाच तास लागले.